सोलापूर

सत्ताधाऱ्यांची उदासीनता ; `या` शहराचे होणार तीन-तेरा

विजयकुमार सोनवणे

सोलापूर ः शहर विकासासंदर्भात महापालिका सभेसमोर आलेल्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेणे अपेक्षित असताना त्यात चालढकलपणा करण्याचा प्रयत्न होत आहे. सोलापूरकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे विषय असलेल्या सभेत कोरम नसल्याने सभा तहकूब करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली, याचे कोणालाच काही वाटलेले नाही. 
 

शहरवासियांना सुखद धक्का देण्याची संधी घालवली 
गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासीयांसाठी त्रासदायक ठरलेला यूजर चार्जेस रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाकडून आला होता. तो रद्द करण्याचा निर्णय घेण्याची चांगली संधी सत्ताधाऱ्यांना होती, मात्र हा विषय प्रलंबित ठेवून शहरवासीयांना सुखद धक्का देण्यात आपण किती दुर्दैवी आहोत याचा अनुभव त्यांनी आणून दिला. इतर वेळी सभासद प्रस्ताव येतात, त्यावर प्रशासन कार्यवाही करेलच असे नाही. मात्र यावेळी खुद्द प्रशासनानेच प्रस्ताव पाठविला होता, त्यावर निर्णय घेण्याची चांगली संधी सत्ताधाऱ्यांनी घालवली. ज्या मूलभूत सुविधांसाठी यूजर चार्जेस घेतले जातात, त्या सुविधाच जर नागरिकांना मिळत नसतील तर उपयोग काय, हा प्रश्‍न सर्वच पक्षांच्या नगरसेवकांसमोर आहे. तो प्रश्‍न सोडवून शहरवासीयांना स्मार्ट सुखद धक्का देण्याची संधी गेली. 

कोरम राखण्यात सत्ताधारी भाजपला अपयश 
महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची ओरड सभागृहात होत असताना, महापालिकेला तब्बल 10 लाख रुपयांचा दंड होण्याची तरतूद मात्र याच सभागृहातील पदाधिकारी व सदस्यांनी करून ठेवली. जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची मुदत जानेवारीअखेर होती. मध्यंतरी आयुक्त नसल्याने हा विषय प्रलंबित राहिला. ते आल्यावर महापालिकेस दंड बसू नये यासाठी प्रशासनाने तातडीने विषय पाठवून तो मंजूर करण्याची विनंती पदाधिकाऱ्यांना केली. त्यानुसार जानेवारी महिन्यात दुसरी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. त्या सभेत यूजर चार्जेस रद्द करणे आणि समिती स्थापन करणे हे दोन महत्त्वाचे विषयही घेण्यात आले. या दोन विषयांसाठीच ही विशेष सभा बोलावली असे म्हटल्यास त्यात वावगे काहीच नव्हते. मात्र याच ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे नगरसेवकांवर नियंत्रण नसल्याचे दिसून आले. महत्त्वाचे विषय प्रलंबित असतानाही 49 पैकी फक्त 14 नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. विरोधकांचे 17 नगरसेवक होते. कोरमसाठी आवश्‍यक संख्या नसल्याने सभा तहकूब करण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. वास्तविक पाहता हे दोन्ही विषय प्राधान्याने घेऊन नंतर इतर विषयांवर चर्चा केली असती तरी चालले असते. पण विषयाचे गांभीर्य ओळखता न येणारे लोक मोठ्या पदावर बसले तर त्याचे काय परिणाम होतात याचा चांगलाच अनुभव या महापालिकेच्या सभेत आला. 

या प्रलंबित प्रश्‍नांसाठी हवा पाठपुरावा 
- महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध 
- समांतर जलवाहिनीसाठी आवश्‍यक निधी 
- उड्डाणपुलासाठी लागणारा निधी उपलब्ध करणे 
- महापालिकेच्या गाळ्याबाबत प्रलंबित प्रश्‍न 
- कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाच्या शिफारशी लागू करणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT