सोलापूर

`या` महापालिका विभागीय कार्यालयांच्या बैठका पतीराजांकडून `हायजॅक`

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : महापालिका विभागीय कार्यालयांच्या बैठकीत नगरसेवकांएेवजी त्यांचे स्वीय सहायक आणि नगरसेविकांचे पती, भाऊ, मुलांचे वर्चस्व दिसून आले. नगरसेवकांनी चर्चेत सहभागी होण्याएेवजी इतरांनीच प्रश्न उपस्थित केले. 

विभागीय कार्यालयांमध्ये बैठका 
नगरसेवकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी मंगळवारपासून विभागीय कार्यालयांत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आज विभागीय कार्यालय क्रमांक एक आणि दोनमध्ये बैठका झाल्या. सभागृह नेते श्रीनिवास करली व आयुक्त दीपक तावरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

पती, मुलांचा सहभाग 
या बैठकांमध्ये नगरसेविकांएेवजी त्यांच्या पतींनीच चर्चेत सहभाग घेतला. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेविकांना आपल्या प्रभागातील समस्यांची माहिती नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, नगरसेवक पतींच्या भूमिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली यांनी समर्थन केले आहे. प्रभागातील कामे करण्यामध्ये नगरसेविकांचे पती किंवा त्यांचा मुलगा किंवा त्यांचे सहायक अधिकार्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे प्रभागातील अडचणींची माहिती त्यांना माहिती असते. ती माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना व्हावी म्हणून ते सहभागी होतात, असे श्री. करली यांनी सांगितले. 

वर्षानु वर्षे सुरु आहे प्रकार 
सोलापूर महापालिकेतील पतीराज, भाऊ, मुलगा हेच खरे कारभारी हा प्रकार नवीन नाही. यापूर्वीही अनेक वर्षांपासूनचा हा अनुभव आहे. दहा वर्षांपूर्वी एका नगरसेविकाच पती स्वतःच नगरसेवक असल्याच्या थाटात बोलायचा. मी मेंबर बोलतोय असे उघडपणे सांगायचा. अधिकारीही त्यास बोला मेंबर म्हणून संबोधायचा. हा प्रकार सर्रास सुरु आहे. एकीकडे सावित्रीबाई फुलेंचे गुणगान करायचे आणि दुसरीकडे पत्नीला सक्षम होऊ द्यायचे नाही असा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत उघडपणे सुरु आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT