1teacher_27.jpg 
सोलापूर

महापालिकेचे ढिसाळ नियोजन! कोरोनाबाधितांना करावी लागली दोन लाखांची पदरमोड; एकाच शिक्षकाला दोनदा कोरोना ड्यूटी

तात्या लांडगे

सोलापूर : विमा संरक्षण नाही, हॅण्डग्लोज, मास्क नाहीत आणि बंद पडलेले ऑक्‍सिमिटर, थर्मामिटर घेऊन शिक्षकांना शहरात सर्व्हे करावा लागत आहे. नागरिक घरापर्यंत येऊ देत नसतानाही दररोज किमान 50 कुटुंबांचा सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांना दोन- दोनदा ड्यूटी देण्यात आली आहे. तत्पूर्वी, महापालिकेने 30 दिवस ड्यूटी केल्यानंतर त्या शिक्षकांनी नव्याने येणाऱ्यांना काही दिवस प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना कार्यमुक्‍त केले जाईल, असे तत्कालीन उपायुक्‍त पंकज जावळे यांनी आदेश काढले. मात्र, त्यानुसार अंमलबजावणी होत नसल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत.

ड्यूटी न करणारे शिक्षक बाजूलाच ठेवून 30 दिवसांहून अधिक ड्यूटी केलेल्यांवरच 'कुटूंब माझी जबाबदारी'चे काम दिले आहे. तर काही शिक्षकांनी आजारपणाचे कारण पुढे करीत वशिलेबाजी करुन ड्यूटी रद्द करून घेतल्याचीही चर्चा आहे. महापौरांनी कोरोना ड्यूटी करणाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, त्याचीही कार्यवाही अर्धवटच आहे. काही शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी प्रत्येकी दिड ते दोन लाखांची पदरमोड करावी लागली आहे. 

प्रमुख मागण्या...

  • 30 दिवसांहून अधिक दिवस कोरोना ड्यूटी केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्‍त करा
  • सर्व्हे करणाऱ्यांना मास्क, हॅण्डग्लोज द्या अन्‌ ऑक्‍सिमीटर, थर्मामिटरमध्ये तांत्रिक बिघाड नको
  • पोलिस, डॉक्‍टरांसाठी उपाचाराची स्वतंत्र सोय; शिक्षकांसाठीही स्वतंत्रपणे सोय करावी
  • माझे कुटूंब माझी जबाबदारी हे आमचे काम नाही; को-मॉर्बिडच्या सर्व्हेच काम द्यावे
  • शिक्षकांना जोखमेची कोरोना ड्यूटी दिल्याने त्यांना महापालिकेने विमा संरक्षण द्यावे
  •  

महापालिकेने कोरोना काळात द्यावे विमा संरक्षण
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मी यापूर्वी 20 दिवस कोरोना ड्यूटी केली. त्यानंतर पुन्हा 40 दिवस ड्यूटी करुनही कार्यमुक्‍त केलेले नाही. विमा संरक्षण नाही, मास्क, हॅण्डग्लोज दिले जात नाहीत. तापमान मोजणारी मशिन वारंवार बिघडते. महापालिका आयुक्‍तांनी 30 दिवसांची ड्यूटी असल्याचे सांगूनही अद्याप कार्यमुक्‍तीचे आदेश निघालेले नाहीत.
- वैभव शेटे, उपाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना, सोलापूर

ऑक्‍सिमिटर, थर्मामिटरमध्ये बिघाड
महापालिका आयुक्‍तांनी 30 दिवस ड्यूटी केल्यानंतर कार्यमुक्‍त करुन त्याजागी दुसरे शिक्षक नियुक्‍त केले जातील, असे सांगितले. मात्र, आता 46 दिवसांची ड्यूटी करुनही कार्यमुक्‍त केलेले नाही. घरातील कामे, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्‍सिमिटर, थर्मामिटरमध्ये बिघाड होतो. दररोज का येता, तुमच्यामुळेच आम्हाला होईल, अशीही उत्तरे ऐकायला मिळतात.
- मंजुषा भोज, शिक्षिका

रोटेशननुसार सर्वांना मिळावी कोरोना ड्यूटी
शिक्षकांनी 30 दिवस ड्यूटी केल्यानंतर त्यांना कार्यमुक्‍त करुन दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक केली जाईल, असे महापालिकेने सांगितले. मात्र, 40 दिवस होऊनही कार्यमुक्‍त केलेले नाही. आता त्याच शिक्षकांवर 'कुटुंब माझी जबाबदारी'चे काम सोपविले आहे. एवढ्या दिवस एकाच शिक्षकांनी काम केल्यानंतर मुलांकडे कसे लक्ष द्यायचे. 
- देवेंद्र आयचित, शिक्षक

मागितल्याशिवाय मास्क, हॅण्डग्लोज दिले जात नाहीत
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत 35 दिवसांहून अधिक दिवस कोरोना ड्यूटी केली. शहरातील अनेकांना एक दिवसाचीही ड्यूटी आलेली नाही. आम्ही मात्र, 30 दिवसांहून अधिक काळ ड्यूटी केली. विद्यार्थ्यांकडे लक्ष देता येत नाही. मास्क मागिल्यानंतर दिले, तर हॅण्डग्लोज दिले नाहीत. जोखीम घेऊन काम करुनही विमा संरक्षण दिलेले नाही.
- मिनाक्षी पवार, शिक्षिका  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Controversy : चाकणकरांनी अमावस्येला बोट कापून घेतलं ? सुषमा अंधारेंनी फोटो दाखवत केला काळ्या जादूचा आरोप

Nainital Travel: उन्हाळ्यात गुलाबी सरप्राइज हवंय? जापनीज चेरी ब्लॉसमचा नैनीतालमध्ये 'मॅजिक' शो ; नक्की भेट द्या

Project Manager Arrest : थेट CMO कार्यालयातून फरफटत नेलं! 2 लाखांची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजर रंगेहाथ पकडला; पहा थरारक व्हिडिओ

स्टार प्रवाहच्या 'या' अभिनेत्याला रितेशनं केला स्वत:हून फोन, आनंद व्यक्त करत म्हणाला...'रितेश सरांचा स्वत:हून फोन आला आणि...'

फिट्स नेमके मेंदूच्या कोणत्या भागातून सुरू होतात? ‘व्हिडिओ-ईईजी’च्या माध्यमातून शोधणार; केईएममध्ये २५ वर्षांत ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT