सोलापूर : जवळगी (ता. अक्कलकोट) येथून तीन वर्षांपूर्वी जुना विडी घरकूल परिसरातील गंगाई केकडे नगरातील पाहुण्याकडे राहायला आलेल्या तरुणाच्या राहत्या घरात घुसून बुधवारी (ता. २१) पहाटे साडेतीन वाजता एकाने खून केला. प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचा संशय एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे. दशरथ नागनाथ नारायणकर (वय ३६) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दशरथची पत्नी अरुणा व त्यांची मुलगी हॉलमध्ये झोपल्या होत्या. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारस सर्वजण गाढ झोपेत असताना किचनमधून शिलाई मशीन धडधड करण्याचा आवाज फिर्यादी अरुणा यांच्या कानावर पडला. त्या उठून किचनमध्ये गेल्या. त्यावेळी पती दशरथ हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. अरुणा या घाबरून जोरात ओरडल्या. अरुणा यांनी घरात शिरलेल्या एका व्यक्तीचा हात पकडला आणि मुलीला पुढचा दरवाजा उघडायला सांगितला. त्यावेळी त्या व्यक्तीने अरुणा यांच्या हाताला चावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्याचा हात सोडला आणि तो घरामागील दरवाजातून पसार झाला, अशी फिर्याद अरुणा नारायणकर यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून दशरथ नारायणकर याचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
काही तासांतच संशयित ताब्यात
मयत दशरथ हा ऑनलाइन गेम्स खेळत होता. त्याचा पहाटेच्या सुमारास एका तरुणाने घरात शिरून खून केल्याचा गुन्हा दाखल होताच शहर गुन्हेने तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काही तासांतच संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशी सुरु असून प्रेमसंबंधातून हा खून झाल्याचा संशय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.