सोलापूर

आईबाबा चिंता नसावी आम्ही सर्व व्यवस्थीत आहोत

सकाळ वृत्तसेवा

आईबाबा चिंता नसावी आम्ही सर्व काळजी घेत आहोत 

सोलापूर, ः सर्वत्र कोरोना आजाराची चर्चा असताना शहरातील विद्यानगरातील एकुण 18 जण सध्या विवीध देशात स्थायीक असून कोरोनाच्या संकटात ही मंडळी त्यांच्या सोलापूरातील पालकांना आईबाबा काळजी नको असे सांगत स्वतःची उत्तम काळजी घेत आहेत. 
शहरातील विद्यानगरातील एकूण 18 मुले परदेशात आहेत. कतार, ऑस्ट्रेलीया, युएसए, स्वीझरलॅंड अशा अनेक देशात शिक्षण व नोकरीच्या निमीत्ताने गेले आहेत. कोरोनाचा उद्रेक जगभर झाल्यानंतर विदेशातील या मुलांनी स्वतःची काळजी घेत पालकांना दिलासा दिला आहे. 

शुभम महागावकर याने सांगीतले की, सध्या व्हर्जीनीया (युएसए) मध्ये स्टे ऍट होमचे आदेश दिले आहेत. भारतीयांच्या तुलनेत येथील नागरिकांची गर्दी हा प्रकार तसा फार कमीच असतो. तरी देखील सर्व भारतीय काळजी घेत आहेत. अमेरिकेत काही भागात आता स्टे ऍट होमचे आदेश दिल्याने दिलासा मिळाला आहे. भारताप्रमाणेच घरात राहून कामे केली जात आहेत. 

सोलापूरच्या मिहीर महागावकर यांनी तेथील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना भारतीयाकडे लक्ष देण्याची सुचना केली. केंद्राचे परराष्ट्र मंत्रालयाने सर्व भारतीयांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत दिली आहे. विवीध देशातील भारतीयांच्या संपर्क ठेवून भारतीय दुतावासासोबत त्यांना जोडण्याचे काम चालवले आहे. लॉस एंजीलीस व कॅलीफॉर्नीयामध्ये लॉकडाऊन आहे. भारतीय दुतावासाकडून देखील भारतीयांच्या गरजेनूसार व्हीसा मुदत वाढवून दिली जात आहे.जिनीव्हामध्ये सर्व आरोग्य सेवा उत्तम पध्दतीने उपलब्ध आहेत. स्विर्त्झलॅंड हे वेलफेअर स्टेट असल्याने तेथील सुवीधांचा दर्जा देखील विशेष आहे. विदेशात असलेले सोलापूरकर एकत्र येऊन या स्थितीचा स्टे ऍट होम व इतर नियमाचे पालन करून स्वतःची उत्तम काळजी घेत आहेत. डॉ.मंगेश शहा यांचा आर्यलॅंडमध्ये असलेला मुलगा भारतात आल्यानंतर विमानसेवा बंद झाल्याने सोलापूूरातच थांबला आहे. विशाखा कुमठेकर यांचा  कौस्तुभ हा मुलगा पेनस्लाव्हेनीया तर चैतन्य हा मुलगा न्यु जर्सी मध्ये आहे. त्यांच्या नातीची शाळा घरीच ऑनलाईन पध्दतीने सुरु आहे. अमेरिकेत भारताने केलेल्या लॉकडाऊनबद्दल अमेरिकन कौतुक करत असतात. मोठी लोकसंख्या असूनही भारतात कोरोना विरोधातील लढा उत्तम चालु असल्याचे अमेरीकन बांधवांचे म्हणणे असे भारतीयाकडून एैकण्यास मिळते. 

काळजी नको 
येथील सरकारकडून कोरोनासाठी उत्तम कार्यवाही केली जात आहे. आम्ही सर्व भारतीय दुतावासाच्या सातत्याने संपर्कात आहोत. - मिहीर महागावकर, जीनीव्हा. 

स्टे ऍट होमने दिलासा 
येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्टे ऍट होमचे पालन केले जात आहे. भारतात लॉकडाऊन मुळे नेमके काय करायचे हे माहीती झाल्याने आम्ही तयारी करू शकलो 
शुभम महागावकर, व्हर्जीनीया युएसए 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Changes : रामनवमीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी वाहतुकीत बदल

भारत पाकिस्तानसारखा 'दलाल देश' नाही; सर्वपक्षीय बैठकीत इराण युद्धात मध्यस्थीच्या मुद्द्यावर जयशंकर यांचं उत्तर

Solapur News : विखे-पाटलांचे कडक आदेश: अधिकाऱ्यांची पळापळ, माढ्यात पाणीच पाणी!

Customs Duty: कस्टम ड्यूटी पेमेंटमध्ये मोठा बदल! UPI द्वारे पेमेंटला मंजुरी; CBIC चा मोठा निर्णय, नेमकी प्रक्रिया काय?

वकिलाचे न्यायमूर्ती झालो, आता निवृत्तीला आलो तरी रुग्णालय नाही; मेळघाटातल्या कुपोषणावरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं

SCROLL FOR NEXT