सोलापूर : नव्या संसद भवनाला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याची मागणी 
सोलापूर

सोलापूर : नव्या संसद भवनाला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याची मागणी

राज्यमंत्री भगवंत खुबा यांची बिदर येथे भेट घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणारे हे निवेदन दिले आहे.

उमेश महाजन

महूद : नवी दिल्ली येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या संसद भवनाला(सेंट्रल विस्टा) लोकशाही तत्वाचे जनक जगतज्योती महात्मा बसवेश्वर संसद भवन असे नामकरण करण्यात यावे,अशी मागणी महाराष्ट्र वीरशैव सभेच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्र वीरशैव सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय ऊर्जा,रसायने व खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांची बिदर येथे भेट घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणारे हे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, देशात इ.स.1105 ते 1167 या कालखंडात जगतज्योती म.बसवेश्वर हे संत होऊन गेले.महात्मा बसवेश्वर यांनी सर्वात प्रथम आपल्या देशाला आणि संपूर्ण जगाला लोकशाही हे तत्व पटवून दिले.बाराव्या शतकात या तत्त्वाचा त्यांनी अत्यंत तळमळीने व आत्मीयतेने प्रसार व प्रचार केला.बाराव्या शतकातील हे त्यांचे कार्य अद्भुत व अलौकिक आहे.कर्मठ व चातुर्वर्ण्याच्या चिरेबंदी बुरुजावर हल्ला करणारे ते बिनीचे सरदार होते.जातीभेद गाडून समतेची मंगलप्रभा पसरविणाऱ्या म.बसवेश्वर यांनी स्त्रियांना मुक्तीचे पंख दिले.अस्पृश्यांच्या अंतरंगात आत्मविश्वास जागवणारे व समाजात समता तत्व रुजवणारे ते समता नायक होते.अनुभव मंडपाच्या माध्यमातून सर्व जातीधर्माचे स्त्री-पुरुष यांना लिहिण्याचे,बोलण्याचे, आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य त्यांनी बहाल केले होते.लोकांना फसव्या कर्मकांडाच्या मोहजाळातून मुक्त करून वास्तवाच्या दुनियेत घेऊन जाणारे ते जीवनदाते होते.

बाराव्या शतकात जगाच्या पाठीवर कोणालाही लोकशाही यंत्रणेबद्दल काहीही माहिती नव्हती,अशा काळात महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाही तत्व आम जनतेला समजावून सांगितले.लोकशाहीचा ठाम पुरस्कार करणारे महात्मा बसवेश्वर हे आद्य पुरुष होते.त्यांच्या लोकशाही बाबतच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक देशाच्या सर्वोच्च सभागृहात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत.पुतळे स्थापित करण्यात आलेले आहेत. लोकशाही तत्वाचा जनक असलेल्या या महापुरुषाचे नाव आपल्या देशात नव्याने उभारण्यात येणाऱ्या लोकप्रतिनिधी सभागृहास देण्यात यावे अशी मागणी समस्त देशवासीय व लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात येत आहे,असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके,सरचिटणीस चंद्रशेखर होनराव, कोषाध्यक्ष सुरेंद्र गाडवे आदी उपस्थित होते.खते व रसायने राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी आपली मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवू असे यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT