solapur  sakal
सोलापूर

Solapur News : बारामतीचा संघ ठरला मोहोळच्या दहीहंडीचा मानकरी मुंबईचा महिला संघ तृतीय

हीहंडी फोडून 1 लाख 11 हजार 111 रुपयाचे पारितोषिक व चषक पटकावले,

राजकुमार शहा

मोहोळ - शहर मध्यवर्ती दहीहंडी उत्सव समिती व मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी सोहळ्यामध्ये बारामतीच्या शिवशंभो गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून 1 लाख 11 हजार 111 रुपयाचे पारितोषिक व चषक पटकावले,

तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक बारामतीच्या भैरवनाथ संघाने पटकावले, त्या संघाला 77 हजार 777 रुपये व चषक देण्यात आला. या स्पर्धेमध्ये मुंबई येथील साईलीला महिलांचा गोविंदा संघ ही सहभागी झाला होता. त्या संघाला 55 हजार 555 रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या शुभहस्ते विजेत्या संघाला पारितोषक व चषक वितरीत करण्यात आले .मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या वतीने मोहोळ नगरपरिषद कार्यालय समोर या भव्य दहीहंडी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याला मोहोळ विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रमेश कदम यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थितीना गोविंदा पथक व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व रमेश बारसकर यांनी केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.या दहीहंडी मध्ये डिजे,लेझर लाईट शो,फायर फाटका,भव्य स्टेज आदीमुळे कार्यक्रमाची भव्यता दिसून आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूरच्या निवेदिका श्वेता हुल्ले व ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर यांनी केले .हा दहीहंडी उत्सव सोहळा पाहण्यासाठी मोहोळ शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातून युवक, महिला भगिनी व अबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT