solapur news  sakal
सोलापूर

Solapur News : अखेर नीरा उजवा कालव्याच्या मैल ९३ ला सोडले पाणी

शेतकऱ्यांची आंदोलने अन् 'सकाळ'च्या पाठपुराव्याला मिळाले यश

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला : नीरा उजवा कालव्याच्या मैल 93 ला अखेर पाणी सोडल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. 'टेल टू हेड' हक्काचे पाणी नियमानुसार न सोडल्यामुळे येथील शेतकरी शेतकऱ्यांनी आंदोलने केली होती. शेतकऱ्यांचे आंदोलने व 'सकाळ'च्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सांगितले.

नीरा उजवा कालव्याचे पाणी नियमानुसार 'टेल टू हेड' देणे बंधनकारक असताना पाण्यामध्येच राजकारण सुरू झाल्यामुळे या कालव्यावरील मैल 93 ला शेवटच्या गावांना वेळेवर पाणी देण्यात आले नव्हते. यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्याच्या अन्यायाविरोधात चांगलाच आक्रमक झाला होता.

आमच्या हक्काचे पाणी जातंय तरी कुठे ? पाण्यासाठी आम्ही संघर्ष अजून किती वर्षे करावा लागणार ? असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत होते. या हक्काच्या पाण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा उजवा पाटबंधारेच्या पंढरपूर उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलने केली होती. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील व माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या पाण्यासाठी चांगलेच लक्ष दिले होते.

परंतु असे असतानाही शेतकऱ्यांना वेळेवर 'टेल टू हेड' पाणी मिळाले नव्हते. उशिरा का होईना या लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांना सध्या पाणी सुरू झाल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. नियमानुसार उशिरा पाणी मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने या नुकसानीची भरपाई देणार तरी कोण ? असे शेतकरी बोलत आहेत.

या कालव्याच्या फाट्यांच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार पाणी का दिले नाही याबाबत काही शेतकरी सध्या न्यायालयात दाद मागणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

नियमानुसार हक्काचे पाणी वेळेवर मिळावे

निरा उजवा कालव्याच्या फाट्यांचा 'टेल टू हेड' पाणी देणे बंधनकारक आहे. सांगोला तालुक्यात नीरा उजव्या कालव्याचे येणारे पाणी हे अनेक वेळा कमी दाबाने येत असून 'टेल टू हेड'प्रमाणे वाटप होत नाही. यापुढे निरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी नियमानुसार वेळेवर मिळावे अशी या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी आहे. आमच्या हक्काचे पाणी तरी आम्हाला वेळेवर मिळावे.

पाणी नीरेचे, चर्चा मात्र निवडणुकीची

नीरा उजवा कालव्याच्या मैल 93 वरील सांगोला तालुक्यातील शेवटच्या गावांना नियमानुसार हक्काचे पाणी मिळाले नाही. कालव्याच्या शेवटच्या फाट्यांचे अस्तरीकरण झाले तरीहा वेळेवर पाणी मिळत नाही. थोडे दिवस चालणाऱ्या या फाट्यांचे अस्तरीकरण होते मात्र कायमस्वरूपी वाहणाऱ्या कॅनॉलचे अस्तरीकरणाला विरोध होतो याबाबत कोणीच बोलत नव्हते. नियमानुसार हक्काचे पाणी न मिळालेल्या लाभक्षेत्रातील शेतकरी आंदोलनस्थळीच 'आता येवू द्या निवडणूका ! आमचे पाणी जातंय तरी कुठे ? याबाबत निश्चितपणे जाब विचारु. आज वेळ आमच्यावर आली आहे तुमच्यावरही येईल' असे बोलले होते. गेला महिनाभर नीरा उजवा कालव्याच्या पाण्यावरून आगामी निवडणूकीची चर्चा मात्र जोरात रंगत आहे.

शेतकऱ्यांनी 'सकाळ'चे मानले आभार

नीरा उजवा कालव्याच्या मैल 93 ला सांगोला तालुक्यातील 'टेल टू हेड' पाणी न मिळाल्याने याबाबत वेळोवेळी हक्काचे पाणी न मिळाल्याने याबाबत आवाज उठवला होता. पाण्यातील राजकारण, या गावातील शेतकऱ्यांवर होणारे अन्याय याबाबत अनेक वेळा 'सकाळ'मधून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज उठवला होता. सध्या 'सकाळ'च्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या शेवटच्या गावांना नीरा उजवा कालव्यातून फाट्याला पाणी सोडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी 'सकाळ'चे आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT