dengue sakal
सोलापूर

Solapur News : डेंग्यू अन्‌ चिकनगुनिया रुग्णांत वाढ

महापालिका सतर्क; विविध ठिकाणी उपाययोजना सुरू

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - शहर आणि परिसरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा फैलाव सुरू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होते आहे. एकाच दिवसात १० संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिका सतर्क झाली असून प्रशासनाच्यावतीने विविध प्रभागात दौरे, फवारणी, काम सुरू आहे.

पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यात विविध साथीच्या आजाराने आता डोकेवर काढले आहे. महापालिकेच्या शहर व हद्दवाढ भागात कार्यरत असलेल्या नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे.

यामध्ये डेंग्यूचे दहा तर चिकन गुनियाचा एक रूग्ण आढळला आहे. न्यू पाच्छा पेठ, होटगी रोड, विजापूर रोड, रामवाडी, हद्दवाढ भागात परिसरात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेने सर्तकता म्हणून या भागात धुराळणी,

फवारणीचे काम सुरू केले आहे. शहराला तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीसाठा करावा लागत असल्याने डेंग्यू शहरात वाढण्याचा धोका वाढला आहे. नागरिकांनी पाणी उकळून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ज्याठिकाणी डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळत आहेत, त्या ठिकाणी सर्वेक्षण करत महापालिकेची आरोग्य यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT