pi  sakal
सोलापूर

Solapur News : मंगळवेढ्यात पोलीस निरीक्षकाचे फुलांच्या उधळणीत दुसऱ्यांदा स्वागत

राजकीय पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीतील काही जुन्या गुन्ह्याचा तपास करण्यात त्या यशस्वी ठरल्या नाहीत.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या जागी रणजीत माने यांची पुन्हा प्रभारी नियुक्ती करण्यात आली.असून ते दुसऱ्यांदा पोलीस निरीक्षक म्हणून मंगळवेढा पोलीस स्टेशनचा पदभार घेणारे पहिलेच अधिकारी ठरले दरम्यान पोलीस मैदानावर त्यांचे पोलीस कर्मचाऱ्यांनी फुलाची उधळण करून स्वागत केले व कार्यालयाचे दर्शन घेत त्यांनी आज पदभार स्वीकारला.

दुपारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे यांनी काढले व याची कुण कुण मंगळवेढेकरांना लागताच, मंगळवेढ्यातील सोशल मीडियात सिंघम परत आला रे असे टेस्ट्स ठेवण्यात आले होते. रणजीत माने हे पोलीस निरीक्षक म्हणून तालुक्यामध्ये चांगले काम केले.

त्यामध्ये अवैध वाहतूक,गुटका,दारू वारंवार कारवाया करण्यात आल्या.चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले. नंदेश्वर येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी काही क्षणात जेरबंद केले. मात्र राजकीय पदाधिकारी व पोलीस खाते यांच्यात समन्वय ठेवण्यात कमी पडल्यामुळे त्यांना राजकीय रोषाचा सामना करावा लागला त्यानंतर त्यांची नियंत्रण कक्षात बदली झाली होती.

तोच पदभार प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्याकडे सोपवण्यात आला. नयोमी साटम यांनी तीन महिने मंगळवेढ्यात प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना अवैध वाहतुक,धंदे बंद करण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला.

मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीतील काही जुन्या गुन्ह्याचा तपास करण्यात त्या यशस्वी ठरल्या नाहीत. अवैध व्यवसायावरील कारवाईसाठी काही पक्ष संघटना त्यावेळी आंदोलन करीत असताना दुसय्रा बाजूला काही संघटना देखील पोलीस निरीक्षकांच्या कामावर समाधान व्यक्त करुन कौतुक करीत होत्या.

अशा परिस्थितीत पोलीस खात्याकडून अवैध धंदयावर कारवाईचे सत्र देखील दररोज सुरु होते. तपास कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचा जिल्हा पोलीस प्रमुख यांनी विशेष सत्कार देखील केला आता दुसय्रांदा रणजीत माने हे या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून पदभार घेणार आहेत. त्याच रखडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर येऊन पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT