solapur sakal
सोलापूर

Solapur News : पावसासाठी विद्यार्थ्यांचे श्री कीर्तेश्वराला साकडे

केतूर येथील सुभाष विद्यालयाचे विद्यार्थी; ‘भरपूर पाऊस पडू दे, उजनी भरून दे’ असे मागितले मागणे

सकाळ वृत्तसेवा

केत्तूर -(ता.करमाळा) - येथील नेताजी सुभाष विद्यालय व उच्च महाविद्यालयाच्या ८०० ते ९०० विद्यार्थी विद्यार्थिनींनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून केत्तूर नंबर १ येथील प्राचीन कीर्तेश्वर मंदिराला बुधवार (ता.६) रोजी भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरात अद्यापही मोठा पाऊस झाला नाही त्यातच उजनी धरणही पूर्ण क्षमतेने भरलेले नाही, त्यामुळे राहिलेल्या पावसाळ्यात तरी भरपूर पाऊस पडू दे ! उजनीच्या जलाशय पूर्ण क्षमतेने भरू दे ! असे साकडे महादेवाला (कीर्तेश्वर) साकडे घातले.

केत्तूर नं.१ येथे उजनी जलाशयाकाठी प्राचीन महादेव किर्तेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या सभोवताली उजनीचे अथांग पाणी असल्याने परिसर नयनरम्य आहे. येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम हाती घेतले आहे. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर पावसासाठी प्रार्थना केली. या उपक्रमाचे संयोजन प्राचार्य दिलावर मुलाणी व पर्यवेक्षक भीमराव बुरटे यांनी केले होते.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर जाधवर, रामचंद्र मदने, सुभाष सामंत, आत्माराम साबळे, गणेश कोळी, वंतेश कडवे, संदीप हिरवे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी या हेतूने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

तालुक्यात पावसाची स्थिती गंभीरच

पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. जिल्ह्यासाठी वरदायिनी असणारे उजनी धरण यंदा अजूनही वजा पातळीतच आहे. त्यामुळे या चिमुकल्यांनी थेट देवालाच साकडे घालण्यासाठी कीर्तेश्‍वरचे मंदिर गाठले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT