suger factory sakal
सोलापूर

Solapur News :उच्चांकी दरासह दिवाळीसाठी ५० रुपयांचा हप्ता

ॲड. बी. बी. जाधव; ‘जकराया’च्या गाळप हंगामास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

बेगमपूर - जकराया साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामासाठी जिल्ह्यात उच्चांकी दराबरोबरच मागील वर्षीच्या गळीत हंगामातील उसाला दिवाळी सणासाठी प्रतिटन ५० रुपये देणार असल्याचे कारखान्याचे संस्थापक- अध्यक्ष अॅड. बी. बी. जाधव यांनी वटवटे (ता. मोहोळ) येथे जाहीर केले.

येथील जकराया साखर कारखान्याच्या तेराव्या गळीत हंगामाचा प्रारंभ व बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे सभासद डॉ. विष्णू गोडसे, त्यांच्या पत्नी राधा गोडसे आणि तज्ज्ञ संचालक राहुल जाधव व प्रियांका जाधव यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी उमादेवी जाधव, कळंब येथील नॅचरल शुगरचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, जकरायाचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, पूर्णवेळ संचालक राहुल जाधव, प्रगतशील बागायतदार प्रभाकर पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, माजी सरपंच रफिक पटेल, रामचंद्र पतंगे आदी उपस्थित होते.

यावेळी अॅड. जाधव म्हणाले, जकरायाकडून मागील हंगामासाठी तालुक्यात सर्वाधिक २३५० रुपये दर दिला आहे. यंदाही हीच परंपरा कायम राखणार असून, शेतकऱ्यांनी जकरायाला जास्तीत जास्त ऊस द्यावा.

यावेळी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट

यावर्षीच्या हंगामासाठी २०० ट्रॅक्टर, ३०० बैलगाडी, दीडशे डंपिंग ट्रॅक्टरचे करार करण्यात आले असून, यंदा कारखान्याने चार लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा कार्यरत ठेवल्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT