Solapur News sakal
सोलापूर

Solapur News : पंढरपुरात धोकादायक इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर;आषाढीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या जीवाला घोर,उपाययोजनांची मागणी

येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात अनेक जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत.या सर्व इमारती धोकादायक असल्याची गंभीर आणि तितकीच चिंताजनक बाब समोर आली आहे. धोकादायक इमारतीमुळे आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या जिवाला मात्र घोर लागला आहे.

- भारत नागणे

पंढरपूर : येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात अनेक जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारती मोठ्या प्रमाणावर आहेत.या सर्व इमारती धोकादायक असल्याची गंभीर आणि तितकीच चिंताजनक बाब समोर आली आहे. धोकादायक इमारतीमुळे आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या जिवाला मात्र घोर लागला आहे. मंदिर परिसरातील धोकादायक इमारतींवर आषाढी यात्रेपूर्वी कारवाई करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी वारकरी संघटनांनी केली आहे.

आषाढी यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक पंढरीत विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येतात. पंधरा दिवस शहरातील विविध मठ,मंदिरे, धर्मशाळा, वाडे आणि रहिवासी इमारतीमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. यातील बहुतांश जुन्या इमारती या धोकादायक आहेत. अशा धोकादायक इमारतीमध्ये वारकरी आपली जीव मुठीत धरुन राहातात.

राज्यात अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा मुद्दा गाजत असतानाच दक्षिण काशी असलेल्या पंढरीत धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.सध्या आषाढी यात्रेचे नियोजन सुरु झाले आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर यात्रेची तयारी सुरु झाली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगर पालिकेने शहरातील इमारतींचा सर्वे केला आहे. त्यामध्ये सुमारे ११३ इमारती धोकादायक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरवर्षी यात्रा काळात धोकादायक इमारतीच्या मालकांना पालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपाची नोटीस देण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र अशा इमारतींवर कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे मंदिर परिसरातील अशा धोकादायक इमारती वारकऱ्यांसाठी काळ बनून आजही तशाच उभ्या आहेत. मागील दोन वर्षापूर्वी निर्माणाधीन घाटाची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच ते सहा वारकऱ्यांचा बळी गेला होता.

यापूर्वी अशा अनेक छोट्या मोठ्या घटना घडल्या आहेत. यावर्षी पाऊस आणि वादळी वारे येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पावसाळ्यापूर्वी वारकऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन अशा धोकादायक इमारती पाडाव्यात अशी मागणी वारकरी संघटनेचे ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी केली आहे.

पंढरपूर शहरात सुमारे ११३ धोकादायक इमारती आहेत. आषाढी यात्रेच्या निमित्ताने अशा धोकादायक इमारतींचा सर्वे करण्यात आला आहे. धोकादायक इमारत मालकांना इमारत खाली उतरवून घेण्यासाठी लेखी सूचना दिल्या आहेत. आषाढी यात्रेपूर्वी मालकांनी स्वतः हून इमारती खाली उतरवून घेतल्या नाहीत तर पालिकेच्या वतीने अशा इमारती पाडण्यात येतील. वारकऱ्यांनी अशा इमारतीमध्ये राहू नये.

- सुनील वाळूजकर,

उपमुख्याधिकारी, पंढरपूर नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT