solapur sakal
सोलापूर

Solapur News : बंदी असताना अवजड वाहन नेले,गांधीगिरी करत चालकाचा सत्कार केला

शहरामध्ये आलेल्या अवजड वाहतुकीमुळे 12 पेक्षा अधिक नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा सकाळ वृत्तसेवा शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याबाबत आदेश असताना देखील बंदीचा नियम मोडून शहरात प्रवेश केलेल्या अवजड वाहनधारकाचा येथील शहरानजीक असलेल्या चोखोमेळा नगर ग्रामस्थांनी गांधीगिरी करत सत्कार केला.

शहरामध्ये आलेल्या अवजड वाहतुकीमुळे 12 पेक्षा अधिक नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला.तर यामध्ये अनेक जण जखमी देखील झाले. अशा परिस्थितीत ही अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली.

परंतु प्रशासनाने याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष केले.परंतु शिवसेनेचे नारायण गोवे व वारी परिवाराच्या सदस्याने यामध्ये सातत्याने पाठपुरावा केला. आ.समाधान आवताडे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात घेतलेल्या स्वयंसेवी संस्थाच्या बैठकीत देखील अवजड वाहतुकीचा मुद्दा प्रकर्षाने गाजला होता

. त्यानंतर सद्गुरु बैठकीसाठी जाणाऱ्या एका महिलेला अवजड वाहनाने चिरडले त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत अवजड वाहतूक बंद केल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याचा पवित्रा घेतला.

त्यानंतर काही वेळात प्रशासनाने याबाबत हालचाली करत पंढरपूर रोडवर साडेचार मीटर उंचीची कमान उभा करण्यास सुरुवात केली. हे काम पूर्ण होण्यास अजून बराच अवधी आहे असला तरी सध्या अवजड वाहतूक करणाय्रा वाहनधारकाने आपले नेण्याचा प्रयत्न केला दरम्यान जागृत असलेल्या ग्रामस्थांनी त्याला हटकले व अपघातामुळे शहरातील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे आपण इथून वाहन नेऊ नये असे विनंती करत त्या वाहनधारकाचा गांधीगिरी करत सत्कार केला व परत पाठवून पर्यायी मार्गाने जाण्याचे सूचना केल्या. यावेळी शंकर गांडोळे,सुहास पवार, संभाजी नागणे, अभिराज जावळेकर, दत्ता देशमुख, शिवाजी जगदाळे, अमित सावंत, सुरेश पाटील, कृष्णा ओमने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT