solapur news  sakal
सोलापूर

Solapur News : मंगळवेढ्यात जि.प.कर्मचाऱ्याचे कामबंद आंदोलन

मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनातील खुर्च्या व काचेचे मोडतोड करून नामफलकावर शाईफेक करून दहशत

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनातील खुर्च्या व काचेचे मोडतोड करून नामफलकावर शाईफेक करून दहशत निर्माण केल्याच्या कारणावरून मंगळवेढा पंचायत समितीच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे पंचायत समितीत कामासाठी आलेल्या ग्रामीण जनतेला रिकाम्या हाती परतावे लागले.

या काम बंद आंदोलनामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ मंगळवेढा,जि. प.ग्रामसेवक युनियन डीएनई-136 मंगळवेढा, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, जि. प. कर्मचारी युनियन मंगळवेढा, हा संघटनेतील कर्मचारी हे कामबंद आंदोलनात सहभागी झाले. याबाबत कारवाईच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मंगळवेढा यांना देण्यात आले.

काल सोलापुरात बिंदू नियमावलीवरून जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक भरती व पदोन्नती केली जाणार आहे या बिंदू नियमावलीत धनगर समाजाच्या जागा कमी केल्याचा राग मनात धरून काहीनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनात प्रवेश करून

अभ्यंगतासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्याची फेकापैकी करून काचाची फोडतोड केली व त्यांच्या नामफलकावर शाईफेक करून निषेध व्यक्त केला या घटनेने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. या घटनेवरून जि. प. विविध शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून

काही समाजकंटकानी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर असलेल्या परिचरांना ढकलून या कार्यालयाची नाशधूस करून केलेल्या कृत्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे व असुरक्षितेची भावना निर्माण झाली.असे कृत्य करणाऱ्या वर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात नमूद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT