महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सरकारकडे केली आहे.  sakal
सोलापूर

सोलापूर : खासगीकरणाविरोधात एकवटल्या परिचारिका

विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत काम बंदची हाक

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: खासगीकरणाविरोधात मुंबई येथील आझाद मैदानावर परिचारिकांच्या वतीने तीनदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर २६ व २७ मे रोजी काम बंद आंदोलन झाले. मात्र यावर तोडगा निघाला नसल्यामुळे उद्या (शनिवार) पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याध्यक्षा डॉ. मनीषा शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ाशासनाने कंत्राटी पद्धतीने परचारिकांची पदे भारण्यास मान्यता दिली आहे, ती रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने सरकारकडे केली आहे. यापूर्वीही शासनाने परिचारिकांनी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर मागण्या तात्पुरत्या स्वरूपात मान्य केल्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनाकडे शासनाने दुर्लक्ष केले. आता लेखी आश्वासनानंतरच कामावर परत येण्याचा निर्णय घेतला असून, जोपर्यंत ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत एकही परिचारिका कामावर हजर होणार नसल्याचे राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व डॉ. शिंदे यांनी बोलताना सांगितले. या आंदोलनात आशा माने, शशिकांत साळवे, वीरेश महाजनी, मीरा सर्वगोड, संध्या जाधव, संध्या गावडे, आशा कसबे, आशा वाघमोडे यांच्यासह विमा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल आदी रुग्णालयांतील ४०० परिचारिकांचा समावेश होता.

आम्ही राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली, मात्र त्यांच्याकडून ठोस असा कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. २८ मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार आहे.

- डॉ. मनीषा शिंदे, राज्याध्यक्षा, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना

परिचारिकांच्या प्रमुख मागण्या...

  • केंद्र शासनाप्रमाणे वेतनवाढ देण्यात यावी

  • केद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांनाही गणवेश भत्ता मिळावा

  • पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती कंत्राटी पद्धतीने न करता कायमस्वरूपी पदभरती करावी

  • परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता नव्याने मंजूर करावा

  • कर्मचाऱ्यांच्या नियोजित विनंती बदल्या नियमित कराव्यात

  • शैक्षणिक पात्रतेनुसार कर्तव्य व जबाबदाऱ्या द्याव्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT