Solapur Sakal
सोलापूर

Solapur : शहरातील उड्डाणपुलांसाठी एक लाख सह्यांची मोहीम

सोलापूर शहरासाठी दोन उड्डाणपूल मंजूर होऊन नऊ वर्ष झाली.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - भविष्यात शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू असलेले दोन उड्डाणपूल प्रकल्प त्वरित होण्याची गरज आहे. हे रखडलेल्या प्रकल्प लवकर सुरू व्हावे, यासाठी नागरी कृती समितीच्यावतीने ‘एक लाख सह्यांची मोहीम’ राबविण्यात आली.

सोलापूर शहरासाठी दोन उड्डाणपूल मंजूर होऊन नऊ वर्ष झाली. अद्याप उड्डाणपूल कामास सुरवात करण्यात आली नाही. शहरात खराब रस्त्यांमुळे व खड्ड्यांमुळे अपघात होऊन शेकडो निष्पापांचे बळी गेले आहेत.

प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना जागे करण्यासाठी कृती समितीच्यावतीने ही सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेत हजारो नागरिकांनी आपला रोष व्यक्त करत सह्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत.

अशोक चौक येथे सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ६ ऑगस्ट रोजी पार्क चौक येथे सह्यांची मोहीम राबविण्यात येईल. नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन निरंजन बोद्धूल यांनी केले.

या मोहिमेसाठी लखन बोद्धूल, देविदास चन्ना, रवी येमूल, राजेश कंदी, अनिल चौगुले, रवी परकीपंडला, पुरुषोत्तम बोग, विश्वनाथ येलदी, व्यंकटेश कुडक्याल, नरेश देवसानी आदी परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Puri: जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर घारींचा थवा; स्थानिकांनी ओळखला धोक्याचा इशारा, 'ती' भविष्यवाणी...

Latest Marathi News Live Update: तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा विधानभवनाकडे मोर्चा

Dhurandhar Movie Location: धुरंधर चित्रपटाची लोकेशन करा एक्सप्लोर आणि बजेटमध्ये ट्रिपचा अनुभव घ्या...

Mumbai Metro: कल्याण-डोंबिवलीत मेट्रो कामांना वेग गती! शंभराव्या गर्डरची उभारणी

Promo : समर-स्वानंदी हळूहळू एकमेकांच्या पडतायेत प्रेमात ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता माती खाऊ नका"

SCROLL FOR NEXT