crime sakal
सोलापूर

Solapur News: पंढरपूर येथे गोळीबार, झटापटीत दोन जखमी

दरम्यान दरोडेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत 2 वेळा गोळीबार केला

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : गावठीकट्टा, मिरची पूड, लाठ्याकाठ्या, दुधारी चाकू व राँड घेऊन दरोडा किंवा जबरी चोरी व लुटमारीच्या उद्देशाने स्कार्पिओ या चार चाकी वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांनी पंढरपूर येथील उबदार कपड्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा दरोड्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत दोन जण जखमी झाले असून एकाला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. ही अत्यंत खळबळ जनक घटना मंगळवारी (ता.14) रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्हा येथील 25 ते 30 दुकानदार गरम कपडे विकण्यासाठी औरंगाबाद जवळील पंढरपूर येथे आलेले आहेत. औरंगाबाद पुणे महामार्गाच्या दुतर्फा त्यांची दुकाने आहेत. नेहमीप्रमाणे दिवसभराची ग्राहकी झाल्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास सर्वांनी झोपडी वजा असलेली दुकाने बंद केली होती. मंगळवारी (ता.13) रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास स्कार्पिओ (एम एच 20,ए जी -6001) मधून पाच ते सहा दरोडेखोर

गावठीकट्टा, मिरची पूड, लाठ्याकाठ्या, दुधारी चाकू व राँड घेऊन आले. त्यांनी प्रथम आसिफ रसूल शहा च्या गरम कपड्याच्या दुकानावर जाऊन पैसे न देता बळजबरीने गरम कपडे काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या आवाजाने या दुकानातील आसिफ हा जागी झाला. त्यांनी कोण आहे? असे विचारतात त्याला दुधारी चाकू काढून धमकावण्यात आले. त्याने आरडाओरडा करताच शेजारील दुकानदार त्याच्या दिशेने येत असतानाच दुसऱ्या दरोडेखोराने लोखंडी हातोडा उभारून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो तिकडेच थांबला.

गोळीबार व दगडफेक -

दरम्यान दरोडेखोरांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत 2 वेळा गोळीबार केला. यावेळी उडालेल्या गोंधळामुळे सर्वच दुकानदार खडबडून जागे झाले. त्यांनी गोळीबार करणाऱ्यां व स्कार्पिओच्या दिशेने दगडफेक केली. याच गडबडीत स्कार्पिओ गाडी सुरू न झाल्याने व आपण पकडले जाऊ नये. म्हणून दरोडेखोर स्कार्पिओ घटनास्थळी सोडून प्रसार झाले

स्कार्पिओ जगाचा फुटल्या, एक जखमी -

या झटापटीत स्कार्पिओची पाठीमागील व बाजूच्या काचा फुटल्या असून राजू गोवर्धन बंजारा वय 32 हा जखमी झाला. तर मुकेश उर्फ भिमा नथुलाल बंजारा 35 हा बालंबाल बचावला असून राजू बंजारा यास उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव -

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ, चेतन ओगले, धनराज राठोड, पोलीस अंमलदार अविनाश ढगे, योगेश शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान वाळुज एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्कार्पिओ गाडी ताब्यात घेतली. दरम्यान फॉरेन्सिक लॅब च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख व त्यांच्या पथकाने स्कार्पिओ ठसे घेतले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

Prakash Ambedkar: शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का?: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

Bachchu Kadu: भाजपकडून माझ्या बदनामीचा अजेंडा : बच्चू कडू; कर्जमाफीपर्यंत सरकारला सोडणार नाही, नेमकं काय म्हणाले?

Pune Koregaon Park Accident Update : पुण्यातील कोरेगाव पार्क अपघात प्रकरणातील तिसऱ्या तरुणाचाही मृत्यू, नेमकी घटना काय होती? संपूर्ण माहिती समोर

SCROLL FOR NEXT