अनियमीत वेतन sakal
सोलापूर

सोलापूर : सेवानिवृत्तीनंतरही मिळेना वेतनातील फरक

पालकमंत्री म्हणाले द्यायला लावतो; महापालिका म्हणते तिजोरी रिकामीच

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सेवानिवृत्ती नंतरही सहाव्या वेतन आयोगातील फरकाचे दोन हप्ते व सातव्या वेतन आयोगातील २३ महिन्यांचा फरक अजूनपर्यंत मिळालेला नाही. या पार्श्‍वभूमीवर काही शिक्षकांनी आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्री म्हणाले, महापालिका आयुक्‍तांना लगेचच तो फरक द्यायला सांगतो. मात्र, तिजोरीत पैसे नसल्याने ही रक्‍कम मिळत नसल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे.

महापालिकेच्या शिक्षण मंडळातील जवळपास आठशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. दरवर्षी महापालिकेचे बजेट झाल्यानंतर त्यातून त्या सेवानिवृत्त शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना पेन्शन, भत्ते दिले जातात. मात्र, सहावा वेतन आयोग लागू होऊन अनेक वर्षे झाली. आता सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना वेतन मिळू लागले आहे. तरीही, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळालेला नाही. दरम्यान, सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा २३ महिन्यांचा फरक मिळालेला नाही. तत्पूर्वी, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचे दोन हप्तेही मिळालेले नाहीत, अशी व्यथा त्या शिक्षकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली.

त्यावेळी हा विषय कोणाकडे होतो म्हणून पालकमंत्र्यांनी विचारणा केली. ते शिक्षक म्हणाले, हा विषय महापालिका आयुक्‍त आणि प्रशासनाधिकाऱ्यांकडे आहे. त्यांना कॉल करून हा विषय लगेच मार्गी लावण्यास सांगतो, असे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिली. त्यावेळी त्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य पहायला मिळाले. मात्र, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले पालकमंत्री भरणे हे महापालिका आयुक्‍तांना आवर्जुन सांगतील का, त्यानंतर आपल्याला ती रक्‍कम लगेच मिळेल का, असे प्रश्‍न त्या शिक्षकांच्या मनात कायम राहिल्याचेही त्याठिकाणी पहायला मिळाले.

वेतनातील फरकासाठी अडीच कोटींची गरज

महापालिकेच्या शिक्षण मंडळातील जवळपास आठशे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना सहाव्या वेतन आयोगातील दोन हप्ते तर सातव्या वेतन आयोगाचा २३ महिन्यांचा फरक मिळालेला नाही. त्यासाठी साधारणपणे अडीच कोटींची गरज असून बजेट तरतुदीनुसार ती रक्‍कम मिळणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने त्यासाठी विलंब होत असल्याची वस्तूस्थिती प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून मांडली. दरम्यान, सहा टक्‍के महागाई भत्त्याचा फरक देण्याचा निर्णय आज सर्वसाधारण सभेने घेतला असून ५५ सेवानिवृत्त शिक्षकांना तो फरक मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT