P. Shivshankar.
P. Shivshankar. esakal
सोलापूर

Solapur : फेज-वन उड्डाणपूल मार्गातील ३१ मिळकतींचा होणार निवाडा : आयुक्त पी. शिवशंकर

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : जुना पूना नाका ते पत्रकार भवन या फेज एकमधील उड्डाणपूल मार्गातील पूना नाका ते शिवाजी चौक या एक किलोमीटर अंतरामधील ३१ मिळकतींची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याच्या भूसंपादनासाठी साधारण दहा कोटी रुपये लागणार असून, या पहिल्या टप्प्यातील निवाडा जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आज (सोमवारी) अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

जुना पूना नाका ते पत्रकार भवन या फेज एकमधील उड्डाणपुलाची लांबी ही ५.५ किलोमीटर इतकी आहे. या मार्गातील बाधित १३७ मिळकतींपैकी १३३ बाधित जमिनींचे अंतिम मूल्य निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये ११७ मिळकतींवर बांधकामे आहेत. शासकीय जागांना टीडीआर आणि आरसीसी देण्यात तांत्रिक अडचणी होत्या.

त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. शासनाच्या जागा वगळून खासगी जागांचे मूल्यांकन करण्यात आले. या ५.५ किलोमीटर अंतरावर जागांच्या बदलत्या रेडिरेकनर दरानुसार नऊ टप्पे पाडण्यात आले. एकूण नऊ व्हॅल्युएशन झोन निश्चित केले आहेत. या सर्व जागांचे मूल्यांकन निश्चित केले असले तरी अंतिम प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

त्यामुळे व्हॅल्युएशन झोननुसार टप्प्या- टप्प्याने निवाडा करण्याचा निर्णय महापालिका व भूसंपादन विभागाकडून घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जुना पूना नाका ते शिवाजी चौक या मार्गातील ३१ मिळकतींचे साधारण दहा कोटींचे मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे.

शासकीय जागांबाबत नंतर निर्णय

फेज वनमध्ये रेल्वे, पोस्ट, एमएसईबी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळाची जागा आहे. शासकीय जागांबाबत शासनस्तरावर निर्णय होणार आहे. दरम्यान, खासगी मिळकतींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करून निवाडा जाहीर करण्यासाठी नऊ टप्प्यांत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवावे लागणार आहे. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शासकीय जागा वगळून खासगी जागांचा निवाडा जाहीर करण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे.

साडेपाच किलोमीटर अंतरामध्ये नऊ झोन

जुना पूना नाका ते पत्रकार भवन असा ५.५ किलोमीटर मार्गावरील नियोजित उड्डाणपूल रेल्वे स्टेशनमार्गे प्रस्तावित आहे. या साडेपाच किलोमीटर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणच्या जागांचे रेडिरेकनर दर हे वेगवेगळे आहेत. यामध्ये बाधित होणाऱ्या मिळकतींचे मूल्यांकनही वेगवेगळे असणार आहे. जागांच्या रेडिरेकनर दरानुसार नऊ झोन निश्चित करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT