Police Recruitment Sakal
सोलापूर

Solapur : पोलिस भरतीसाठी साडेसहा हजार पदवीधर

सोलापूर शहरात ‘बीए-एमए, बीएस्सी, बीकॉम, बीटेक’चेच सर्वाधिक उमेदवार

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यात कोरोनानंतर बेरोजगारी वाढल्याची स्थिती समोर आली असून पोलिस भरतीसाठी प्राप्त १८ लाख अर्जांमध्ये जवळपास साडेसहा लाख तरुण पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. सोलापूर शहर आयुक्तालयातील चालकांच्या ७३ जागांसाठी तब्बल तीन हजार ४३९ तरुण पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. तर शिपाईच्या ९८ पदांसाठी दोन हजा ९२१ उमेदवार उच्चशिक्षित आहेत.

कला शाखेतून पदवी घेऊनही नोकरी न मिळालेले साडेतीन हजारांहून अधिक उमेदवार पोलिस भरतीतून नशीब आजमावत आहेत. तसेच या भरतीसाठी बीकॉम झालेले सव्वाआठशे तरुण आहेत. विशेष बाब म्हणजे पोलिस भरतीसाठी बीएस्सी, एमएससी, बी-टेक, एमसीए, एमकॉम झालेले तरुण-तरुणींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. पोलिस भरतीच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. बीएड, एमएसडब्ल्यू, इंजिनिअरिंग झालेले उमेदवार देखील पोलिस भरतीची तयारी करीत आहेत. त्यांनी पोलिस भरतीच्या अनुषंगाने लेखी परीक्षेचा चांगलाच अभ्यास केला आहे. आता मैदानी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लेखी सहजपणे उत्तीर्ण होऊ,

असा त्या उमेदवारांना विश्वास आहे.यंदा तरुणांना नोकरीची संधी

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य सरकार शासकीय विभागातील ७५ हजार पदे भरली जाणार आहेत. आता पुढील महिन्यापासून त्याचे नियोजन कागदावर येईल आणि मार्चनंतर टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे तरुणांना त्याठिकाणी निश्चितपणे नोकरीची संधी मिळेल. पण, प्रत्येक भरतीसाठी जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या दहापटीने जास्त असणार आहे. पोलिस भरतीच्या निमित्ताने राज्यातील सुशिक्षित बेरोजगारी समोर आली आहे. स्पर्धा मोठी असेल, पण जिद्द, चिकाटी व परिश्रमातून निश्चित यश मिळेल, असा विश्वास तरूणांनी बाळगावा.

पोलिस भरतीसाठी मैदानातील उमेदवार

बीए : ३,६२५, बीकॉम : ८२१, बीएस्सी : ६८८, एमए : ४०३, एमकॉम : १०६, एमएसडब्ल्यू : ३९, बीई : ६४, बीसीए : ४६, बी.टेक : २२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT