प्राथमिक शिक्षक पतसंस्‍थेची अनगरमध्‍ये वार्षिक सभा
प्राथमिक शिक्षक पतसंस्‍थेची अनगरमध्‍ये वार्षिक सभा  sakal
सोलापूर

सोलापूर : सभासदांसाठी ३० लाखांची कर्ज मर्यादा

सकाळ वृत्तसेवा

अनगर : मनोहर डोंगरे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने या वर्षीपासून जिल्‍ह्‍यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेपेक्षा सर्वाधिक ३० लाख रुपयांच्या कर्ज वाटपाची मर्यादा ठेवून त्याप्रमाणे वाटपही केले. शिवाय पतसंस्थेस यंदाच्या आर्थिक वर्षात १ कोटी ४० लाख ८२ हजार २७६ रुपयांचा निव्वळ नफा झाला. सभासदांना त्यांच्या कायम ठेव रकमेवरील लाभांश १२ टक्के दराने पतसंस्थेचे अध्यक्ष परमेश्वर गुंड यांनी जाहीर करून तो लवकरच सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

डोंगरे पतसंस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता.१९) अनगर (ता. मोहोळ) येथील रुक्मीणी घाटुळे मंगल कार्यालयात झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर गुंड होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले, लोकनेते (स्व.) बाबुरावअण्णा पाटील अनगरकर, मातोश्री (स्व.) लक्ष्मीबाई बाबुराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन सर्व मान्यवरांनी केले.

सेवानिवृत्त झालेल्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचा संस्थेने सत्कार केला. संचालक हनुमंत बंडगर यांनी अहवालाचे वाचन केले. त्यास उपस्थित सभासदांनी मान्यता दिली. सभा खेळीमेळीत झाली. याप्रसंगी तानाजी गुंड, रणजित थिटे, राजन ढवण, आप्पासाहेब देशमुख, राजकुमार राऊत आदींनी संस्था व सभासद हिताच्या सूचना मांडल्या. त्यास संचालक हनुमंत बंडगर यांनी समर्पक उत्तरे दिली.

व्यासपिठावर परमेश्वर गुंड, धर्मराज चवरे, हनुमंत बंडगर, आबा क्षीरसागर, नामदेव कुचेकर, लक्ष्मण गोफणे, ईश्वर वाघमोडे, तानाजी गुंड, श्रीमंत गुंड, आबा टेकळे, आप्पासाहेब देशमुख, रणजित थिटे, गिरीश व्हनकळसे, राजन ढवण, शिवाजी शेटे, धनंजय रणदिवे, ताजमा बागवान, उमा गुंड, तुकाराम ऐवळे, संजय ढेपे, ज्ञानेश्वर गुंड, ऋषीकेश जगताप, गणेश भंडारे, सचिन शिंदे, संजय आतकरे, चरण शेळके, वैशाली थोरात, स्नेहल पावले, समाधान डोलारे आदीं उपस्थित होते.

संचालक गणेश भंडारे यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक लक्ष्मण गोफणे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT