indian railways indian railways
सोलापूर

सोलापूर : रेल्वेच्या साडेतीन लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यामध्ये कोरोनामुळे विनाआरक्षित, विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे.

विजय थोरात

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्यामध्ये कोरोनामुळे विनाआरक्षित, विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. परंतु काही प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांना चकवा देत विनातिकीट प्रवास करीतच आहेत. त्यांच्या प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वेने हाती घेतलेल्या कारवाईत तब्बल तीन लाख ७ हजार ७९३ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून तब्बल १७ कोटी ५० लाख ८८ हजार ८५ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी सांगितले की, एप्रिल २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान सोलापूर रेल्वे तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासोबत इतर तिकीट तपासणीस, रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. यात वाडी ते सोलापूर, सोलापूर ते दौंड, दौंड ते अंकाई अशा विविध भागात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात तब्बल तीन लाख ७ हजार ७९३ फुकटे प्रवासी आढळून आले असून, त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आगामी काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही श्री. हिरडे यांनी सांगितले.

ठळक बाबी

- वाणिज्य विभागाकडून कारवाईसाठी स्वतंत्र पथक

- प्रवाशांनी रेल्वे प्रवास करताना तिकीट काढून करावा प्रवास

- अकरा महिन्यांत मोठी कामगिरी

अशी झाली कारवाई

महिना विनातिकीट प्रवासी आकारण्यात आलेला दंड

एप्रिल ११ हजार ६६२ ६३ लाख १२ हजार

मे ६ हजार ४५४ २८ लाख १९ हजार

जून ११ हजार ३७५ ४७ लाख ५४ हजार

जुलै १७ हजार ६७४ ७२ लाख ६६ हजार

ऑगस्ट २० हजार ८३२ ९५ लाख ४९ हजार

सप्टेंबर २४ हजार ५०५ १ कोटी ३६ लाख ६७ हजार

ऑक्‍टोबर ४ लाख ६ हजार २ कोटी ४९ लाख ६८ हजार

नोव्हेंबर ५५ हजार ८२८ ३ कोटी ४० लाख २८ हजार

डिसेंबर ४१ हजार ७५० २ कोटी ४५ लाख ९ हजार

जानेवारी ३८ हजार २६५ २ कोटी ३४ लाख ७ हजार

फेब्रुवारी ३८ हजार ८३८ २ कोटी ३८ लाख ३ हजार

एकूण ३ लाख ७ हजार १७ कोटी ५० लाख ८८ हजार

रेल्वेने प्रवास करीत असताना प्रवाशांनी नियमित तिकीट काढून प्रवास करावा. अन्यथा अशा प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असून, आगामी काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Maggie video: मॅगी तयार.. ट्रेनमध्येच थाटलं किचन! मराठमोळ्या काकूंनी कायदा घेतला हातात, व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मालवणी पॅटर्न वादावर असलम शेख यांचे अमित साटम यांना खडेबोल

१० वर्ष डेट केलं पण २ वर्षात लग्न तुटलं; अपूर्वा नेमळेकरने सांगितलं घटस्फोटाचं कारण, म्हणाली- मी चुकले

New Labour Laws: मोदी सरकारची ऐतिहासिक चाल! नवीन कामगार कायदे तात्काळ लागू; आता शोषणाला लगाम बसणार

Maval Leopard : खेड–जुन्नरनंतर आता शिरगावात बिबट्या; शेतशिवारात भीतीचं सावट!

SCROLL FOR NEXT