Rail  sakal
सोलापूर

सोलापूरकरांचा पुणे प्रवास खर्चिक

हुतात्मा एक्स्प्रेसचा एक जनरल व एक स्लीपर डबा हटविला

विजय थोरात

सोलापूर : सोलापूर-पुणे-सोलापूर धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसचा एक जनरल तर एक स्लीपर कोच कमी करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अद्यापही आरक्षण करून प्रवास करावा लागत आहे. आरक्षण करुन प्रवास करणे सामान्य प्रवाशांना परवडत नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जनरल डबे नसल्याने खिशाला कात्री लागत आहे. यामुळे जनरल डबे जोडावे, अशी मागणी प्रवासी संघटनेच्यावतीने जोर धरू लागली आहे.

गेल्या एकवीस वर्षांपासून पुणे-सोलापूरच्या प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असलेल्या हुतात्मा एक्स्प्रेसला कोरोनापूर्वी दोन जनरल डबे होते. कोरोना काळात वाहतुकीची सर्व साधने बंद होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरताच हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. जनरल डबे असल्याने प्रवाशांना जनरल तिकीटावर प्रवास करता येत होता. मात्र कोरोनानंतर जनरल डबे काढण्यात आल्याने तिकीट देखील मिळत नसल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. जलद सेवेसाठी हुतात्मा एक्स्प्रेस या मार्गावरील महत्त्वाची गाडी मानली जाते.

एक्सप्रेस सोलापूरहून सकाळी साडेसहा सुटते. ती पुणे स्थानकात सकाळी साडेदहा वाजता दाखल होते. ती गाडी पुण्याहून सायंकाळी सहा वाजून १० मिनिटांनी सुटते. ती सोलापूरला रात्री १०.१५ वाजता पोहचते. प्रवाशांची वाढलेली संख्या व बदलेला काळ यामुळे या गाडीला जनरल डबे जोडावे, अशी मागणी रेल्वे संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

हुतात्मा एक्सप्रेसला कोरोनापूर्वी उपलब्ध असलेले अनारक्षित एक कोच व द्वितीय श्रेणी शयनयान (स्लिपर क्लास)चा एक कोच पूर्ववत जोडावा. प्रवाशांची होणारी गैरसोय प्रशासनाने दूर करावी.

- संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, सोलापूर

हुतात्मा एक्सप्रेसपुढे पुणे-भुसावळ जात असल्याने पूर्वीप्रमाणे एक स्लीपर आणि एक जनरल डबा जोडावा. हुतात्माचे जनरल तिकीट बंद असल्याने ऐन वेळेस जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.

- पियूष संगापूरकर, प्रवासी

हुतात्मा एक्स्प्रेसला जनरल कोच वाढविण्यासाठीचा प्रस्ताव तयार करुन वरिष्ठ स्तरावर पाठविला जाईल. यास मंजूरी मिळताच कोच जोडले जातील.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Timber Smuggling: गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; ६० लाखांचे अवैध सागवान जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

NMC MBBS Admission: दिव्यांग विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार; एमबीबीएस प्रवेशासाठी एनएमसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगत्वच्या टक्केवारीऐवजी क्षमता आणि कार्यक्षमतेला महत्त्व

SCROLL FOR NEXT