Solapur Rain: ऐतिहासिक आष्टी तलावाचा पाणीसाठा वाढला; शेतक-यांना सतर्कतेचा इशारा sakal
सोलापूर

Solapur Rain: ऐतिहासिक आष्टी तलावाचा पाणीसाठा वाढला; शेतक-यांना सतर्कतेचा इशारा

Latest RAin Update: तेलंगवाडी या परिसरात जरी पाऊस पडला तरी या गावांच्या ओढ्याचे पाणी हे आष्टी तलावात येते.

राजकुमार शहा

Latest Rain News: सध्या मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने व आष्टी तलावात 72 टक्के पाणीसाठा झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार, सध्या उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी सोडले आहे. याच पाण्याने व पावसाच्या पाण्याने आष्टी तलावातील पाणीसाठा 72 टक्के झाला आहे.

दरम्यान तलावात कालव्यातून पाणी सोडणे बंद केले आहे. दररोज हवामान खाते पाऊस ज्यादा पडेल असा अंदाज व्यक्त करीत आहे. दरम्यान मोहोळ तालुक्यात जरी पाऊस कमी पडला तरी मोडनिंब,अरण,भेंड, तेलंगवाडी या परिसरात जरी पाऊस पडला तरी या गावांच्या ओढ्याचे पाणी हे आष्टी तलावात येते.

दरम्यान तलावात येणाऱ्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर आष्टी सांडवा व डावा कालवा यातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते.

आष्टी तलाव परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत. तसेच त्या ठिकाणी त्यांची शेती, शेतीला लागणारी अवजारे, जनावरे आहेत. कोणालाही धोका होणार नाही या साठी येवती, रोपळे, बाभुळगाव, तुंगत, नारायण चिंचोली, ईश्वर वाठार व देगाव या गावांच्या सरपंच व ग्रामसेवक यांना पाटबंधारे विभागाने लेखी कळविले आहे. कुठलीही जीवित हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सध्या कालव्यातून तलावात पाणी सोडणे बंद केले आहे. सध्या तलावात 72 टक्के पाणीसाठा आहे. तलावात 85 टक्के पाणीसाठा झाला तर सांडवा उघडावा लागतो. त्यामुळे कुठलीही जीवित हानी व नुकसान होऊ नये यासाठी संबंधित गावच्या सरपंच ग्रामसेवकांना लेखी कळविले आहे.

देवेंद्र दिघे

सहाय्यक अभियंता

पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT