Solapur  Sakal
सोलापूर

Sambhaji Bhide Controversy : मनोहर भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा; विविध संस्था व संघटनांची मागणी

यावेळी भिडेंच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शकांनी परिसर दणाणून सोडला.

सकाळ वृत्तसेवा

Barshi News - संभाजी भिडे यांनी देशाचे स्वातंत्र्य, संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीतावर आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी,

अशी मागणी पुरोगामी पक्ष, संस्था, संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी संयुक्तपणे केली आहे. यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहासमोर बुधवारी (ता. २) निदर्शने आंदोलन करण्यात आले.

संभाजी भिडे यांच्याकडून महिलांबद्दल अत्यंत निंदनीय वक्तव्ये, समाजामध्ये जातीय व सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू आदी महापुरुषांची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

सामान्य बहुजनांच्या कुटुंबातील मुलांमध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी भिडेंच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रवीण मस्तुद, अनिरुद्ध नखाते, भारत भोसले, किसान सभेचे लक्ष्मण घाडगे, किसन मुळे, लहू आगलावे, धनाजी पवार,

अंनिसचे प्रा. डॉ. ए. बी. कदम, प्रा. हेमंत शिंदे, दलित अधिकार आंदोलनाचे भीम मस्के, काँग्रेसचे सतीश पाचकुडवे, वसीम पठाण, संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद, पुरोगामी विचार मंचचे रमेश गवळी, नागनाथ सोनवणे, दलित महासंघाचे संदिपान आलाट, प्रा. डॉ. नवनाथ दनाने, अजित कांबळे, वंचितचे शोएब सय्यद आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT