home sakal
सोलापूर

Mortgage Home : म्हातारपणी रिव्हर्स मॉरगेजने घरच देईल जगण्याचा आधार, कसे ते घ्या जाणून

वृध्दपकाळात पदरी पैसा नसल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या आणि एकाकी पडलेल्या ज्येष्ठांसाठी आर्थिक स्वावलंबन देणारी ‘रिव्हर्स मॉर्गेज योजना जीवनदायी ठरते आहे.

सकाळ वृत्तसेवा

वृध्दपकाळात पदरी पैसा नसल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या आणि एकाकी पडलेल्या ज्येष्ठांसाठी आर्थिक स्वावलंबन देणारी ‘रिव्हर्स मॉर्गेज योजना जीवनदायी ठरते आहे.

सोलापूर - वृध्दपकाळात पदरी पैसा नसल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या आणि एकाकी पडलेल्या ज्येष्ठांसाठी आर्थिक स्वावलंबन देणारी ‘रिव्हर्स मॉर्गेज योजना जीवनदायी ठरते आहे. स्वतःच्या घरावर कर्ज घेऊन त्यावर स्वतःच्या घरखर्च चालवण्यासाठी मदत करणारी ही योजना आहे. स्वत:च्या मालकीचे घर आहे, पण पदरी जगण्यासाठी पैसा नाही, अशा उतारवयामधील वृद्धांना आता काळजी करण्याची गरज नाही. स्वत:चे घर राहण्याबरोबरच जगण्याला लागणारे पैसे देणारे ठरणार आहे. नेमकी योजना काय आहे? या योजनेचा नेमका कोणाला आधार होणार आहे, हे सगळं माहिती करुन घेण्यासाठी दैनिक ‘सकाळ’ची ज्येष्ठांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी तरी वाचा.

ज्या ज्येष्ठांना स्वतःच्या मालकीचे घर आहे पण सांभाळणारे कोणी नाही, उत्पन्नाचा स्रोत राहिला नाही, अशा लोकांसाठी ही योजना वापरली जाते. ही योजना पती व पत्नी या दोघांच्या उपयोगाला येऊ शकते. साठ किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व स्वत:चे घर असलेल्या लोकांना त्याचा फायदा होतो.

या योजनेत बॅंक ग्राहकाच्या मालकीचे घर मॉर्गेज करून त्यावर कर्ज निश्चित करते जे कर्ज या वृद्धांना फेडण्याची गरज नसते. या कर्जाच्या रकमेतून त्यांना वार्षिक उत्पन्न दिले जाते. तसेच त्याच घरात शेवटपर्यंत राहून त्यांना ही मदत मिळते. घराच्या बाजार मूल्याच्या किंमतीच्या ४५ टक्क्यापर्यंत बॅंक कर्ज मंजूर करते. तसेच दर पाच वर्षाला घराचे मूल्यांकन करून वाढीव किंमतीचा लाभ देते. पती व पत्नी या दोघांनी योजनेत सहभाग घेतला असेल तर दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला तरी दुसऱ्याला त्याचा लाभ मिळू शकतो. वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत योजनेचा लाभ मिळतो. कर्जमुदतीची मर्यादा १५ वर्षे एवढी आहे.

केस स्टडी

एखाद्या दांपत्याकडे (ज्यांचे वय अनुक्रमे ६० व ५५ वर्षे आहे) ५० लाख रुपये बाजार मूल्य किमतीचे घर स्वतःच्या मालकीचे आहे. त्याला बाजार किमतीच्या ४५ टक्के म्हणजे २२.५० लाख रुपये रिव्हर्स मॉर्गेज कर्ज मिळू शकते. त्यांना उपचार किंवा घर देखभालीसाठी एकदम १५ लाख रुपये कर्ज मिळू शकते किंवा दीड लाख रुपये वार्षिक रक्कम १५ वर्षापर्यंत मिळू शकतो. दर पाच वर्षाला घराचे मूल्यांकन करून वाढीव कर्जाचा लाभ मिळू शकतो. दोघांपैकी एकाचे निधन मुदतीपूर्वी झाल्यास दुसऱ्या साथीदाराला त्याचा लाभ मिळत राहतो. या दांपत्याने वारसदार निश्चित करणे आवश्यक असते.

रिव्हर्स मॉर्गेज योजनेची वैशिष्ट्ये

- वय ६० ते ८० वर्षे वयाची सहभागाची मुदत

- कर्जावर १०.५० टक्के व्याज

- कर्ज फेडण्याची गरज नाही

- दर पाच वर्षाला मालमत्तेचे मूल्यांकन

- लाभार्थींच्या मृत्यूनंतर वारसदाराला कर्ज फेडून मिळेल घर किंवा बॅंकेकडून विक्रीतून कर्जफेड

या योजनेत वृध्दापकाळातील लोकांना त्यांच्या राहत्या घराच्या आधारे योजनेत सहभागी होता येते. सर्व नियमांची पूर्तता झाल्यानंतर लाभार्थींना विशिष्ट रक्कम वार्षिक, सहामाही किंवा तिमाही पद्धतीने मिळू शकते.

- राजा रमण, मुख्य व्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया, सदर बझार सात रस्ता शाखा, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT