Accident
Accident sakal
सोलापूर

Solapur : चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातात तरुण ठार

सकाळ डिजिटल टीम

सकाळ वृत्तसेवा

महूद - महूद ते अकलूज रस्त्यावर चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कोळेगाव (ता. माळशिरस) येथील एक तरुण वाहनचालक ठार झाला आहे, तर इतर पाच जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात गुरुवारी (ता. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.

महूद ते अकलूज रस्त्यावर येडगेवाडीपासून जवळ असलेल्या वीटभट्टीसमोर या चारचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. कोळेगाव (ता. माळशिरस) येथील एमएच १३, एन ५१७६ या कारमधून पंढरीनाथ पारसे यांच्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन कारचालक ज्योतिराम बापू सावंत हे कटफळ (ता. सांगोला) येथील एका घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते.

कार्यक्रम उरकून घरी परतत असताना अकलूजहून महूदकडे भरधाव येणाऱ्या एमएच ०९, एफव्ही ८५९३ या दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. जोरदार धडकेमुळे दोन्ही वाहनांच्या समोरील बाजू पूर्णतः चुराडा झाल्या. अपघातामध्ये कारचालक ज्योतिराम बापू सावंत (वय ३५) या तरुण वाहन चालकाचा मृत्यू झाला. तर कारमधील इतर पाच प्रवासी जखमी झाले आहेत.

त्यापैकी सुनीता पंढरीनाथ पारसे (वय ५०) यांच्या डोक्याला व हातापायांना गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्योतिराम सावंत हे कोळेगाव परिसरातील नागरिकांसाठी एक उत्तम सेवा पुरविणारा वाहन चालक होते. दूरवरच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांना घेऊन जाण्यासाठी नागरिक त्यांना पसंती देत. अशा वाहनचालकाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर आज (शुक्रवारी) दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलिसांत करण्यात आली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT