corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 52 नवे कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत सोलापूरच्या ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 2 हजार 755 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 703 अहवाल निगेटिव्ह आले असून 52 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून एकाच दिवशी 67 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

ग्रामीण भागातील कोरोना चाचणीचे 46 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील एकूण रुग्ण संख्या आता 37 हजार 636 झाली आहे. त्यातील 35 हजार 644 कोरोना मुक्त झाले असून रुग्णालयात सध्या 885 जणांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 1 हजार 107 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 

आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरस तालुक्‍यातील बोंडले येथील 48 वर्षिय महिला आणि बार्शी मधील गाडेगाव रोड येथील 56 वर्षिय महिला यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अकरा हजार 595 जणांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनमध्ये 2 हजार 751 जण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

LPG चं टेन्शन तर काहीच नाही..अजून खरा बॉम्ब ब्लास्ट आहे बाकी; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार युद्धाची झळ, 'या' 15 वस्तू महागणार

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवर पुलाव तर तुला जपणार आहेच्या सेटवर चुलीवरचं जेवण, चहा सुद्धा केला बंद!

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT