logo 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 57 नवे कोरोनाबाधित, चौघांचा मृत्यू, 123 जण कोरोनामुक्त 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 1 हजार 123 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 66 अहवाल निगेटिव्ह आले असून 57 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 123 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 36 हजार 979 झाली आहे. आजपर्यंत 1 हजार 89 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून रुग्णालयात सध्या 1 हजार 34 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 34 हजार 856 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरस तालुक्‍यातील विझोरी येथील साठ वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील इसबावी येथील 55 वर्षीय महिला, बार्शीतील दत्तनगर येथील 75 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील करकंब येथील 70 वर्षिय महिला यांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे 37 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

Latest Marathi News Live Update : गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

SCROLL FOR NEXT