corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 78 नवे कोरोनाबाधित, चौघांचा मृत्यू, 104 कोरोनामुक्त 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 652 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील दोन हजार 574 अहवाल निगेटिव्ह आले असून 78 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 104 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 37 हजार 277 झाली आहे. आत्तापर्यंत 1 हजार 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून रुग्णालयात सध्या 990 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील 35 हजार 189 जण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना चाचणीचे 46 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरस तालुक्‍यातील कन्हेर येथील साठ वर्षिय पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील डोणगाव येथील 45 वर्षीय पुरुष, मंगळवेढा तालुक्‍यातील मरवडे येथील 85 वर्षीय महिला, करमाळ्यातील वेताळ पेठ येथील 71 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

Soft Skills: कॉर्पोरेट विश्वात केवळ 'डिग्री'ला महत्त्व नाही; मॅनेजमेंट विद्यार्थ्यांकडे 'सॉफ्ट स्किल्स' असणे आता अनिवार्य

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

सेम टू सेम! चाकणकर आणि तटकरेंच्या बोटाची दुखापत अन् कारणही एकच; किती मोठा हा योगायोग? अंधारेंचा सवाल

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

SCROLL FOR NEXT