खेळाडू बसवराज धायगोंडे sakal
सोलापूर

सोलापूर : सलगर बुद्रुक गावासह सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

बसवराजला लहान पणापासून खेळाची विशेष आवड होती

महेश पाटील

सलगर बुद्रुक: मंगळवेढा जिल्हा सोलापूर दुबई येथे झालेल्या हॉलिबॉल स्पर्धेत, अजिंक्य ठरलेल्या भारतीय संघातील प्रमुख खेळाडू बसवराज धायगोंडे याची आगामी 14 मार्च पासून सुरू होणाऱ्या आफ्रिका व 2 जून पासून सुरू होणाऱ्या लंडन येथील हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

सलगर बुद्रुक हे सोलापूर,सांगली व विजयपूर या सीमेवरील दुष्काळसदृश्य गाव.या गावात सामान्य शेतकरी कुटुंबात दोन मोठ्या बहिणींच्या पाठी जन्मलेल्या बसवराजला लहान पणापासून खेळाची विशेष आवड होती.त्यातच सलगर बुद्रुक हे गाव हॉलीबॉल खेळासाठी जिल्ह्यात नावाजलेले गाव होते.इथे भरवलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत राज्यभरातून संघ येत असत.त्यामुळेच बसवराजला या खेळाची गोडी वाढली.

गावातील जुन्या जाणकार हॉलीबॉल खेळाडुंनी बसवराजला हेरले होते.दहावी पर्यंतचे शिक्षण गावी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी बसवराजने सोलापूर गाठले.व तिथेच त्याच्या खेळाला वाव मिळून पुढे त्याने इथपर्यंत मजल मारली आहे.दरम्यान भारतीय संघात बसवराज बरोबर शोएब बेगंपुरे या खेळाडूची देखील निवड झाली आहे.

स्पॉन्सर ची गरज - दरम्यान 14 मार्च पासून आफ्रिका येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी बसवराजची भारतीय संघात निवड झाली खरी पण कोणी स्पॉन्सर मिळत नसल्याने या स्पर्धेत खेळण्याचे बसवराजचे स्वप्न सत्यात उतरणार की नाही हे पहावे लागणार आहे.दुबई येथे झालेली स्पर्धा बसवराज स्वखर्चाने पार पाडली.भारत अजिंक्य राहिला.पण ट्रॉफी शिवाय खेळाडूंच्या पदरात कांहीच पडले नाही.त्यामुळे दानशूर लोकांनी पुढे येऊन बसवराजला मदत करावी असे आवाहन सलगर मधील हॉलीबॉल प्रेमींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT