Mahila Raj  sakal
सोलापूर

Solapur : सरपंच भाभी सापडेना; कारभार उपसरपंचांकडे?

गावातील शंभर जणांची चौकशी, पण बेपत्ता की घातपात तपास लागेना

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या सरपंच भाभी जैतुनबी शेख या ७ सप्टेंबरपासून बेपत्ता आहेत. त्या स्वत:हून बेपत्ता झाल्या की कोणी घातपात केला, याचा ठावठिकाणा अद्याप शहर पोलिसांना लागलेला नाही. १३ दिवसांपासून त्या बेपत्ता असल्याने आता गावचा कारभार ग्रामपंचायत अधिनियमानुसार उपसरपंचांकडे दिला जाईल, अशी माहिती उत्तर सोलापूर पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

बुधवारी (ता. ७) भरदुपारी साडेबाराच्या सुमारास पावणेपाच वर्षे गावचा कारभार हाकलेली महिला सरपंच बेपत्ता होते आणि त्यांच्या कुटुंबियांसह गावातील कोणालाच काहीही माहिती होत नाही, ही बाब पोलिसांना पण विचार करायला लावणारी आहे. सलगर वस्ती पोलिसांनी गावातील जवळपास १०० लोकांकडे सरपंच भाभीबद्दल विचारपूस केली. त्यावेळी ‘भाभी अच्छी थी, उनका किसीसे कोई झगडा नही था’ हेच उत्तर पोलिसांना सातत्याने ऐकायला मिळाले. परंतु, सर्वांसोबत चांगले संबंध असणारी भाभी गाव तथा गावचा कारभार सोडून गेली कुठे, याचा शोध पोलिसांना आव्हानात्मक झाला आहे.

सरपंच भाभीच्या कुटुंबियांसह गावातील एकूण १२ जणांचे जबाब सुध्दा पोलिसांनी घेतले. पण, पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागलाच नाही. एका गावची सरपंच महिला भर दुपारी गावच्या शिवारातून बेपत्ता होते आणि १३ दिवस होऊनही पोलिसांना त्यांचा शोध लागत नाही, ही बाब चिंताजनक मानली जात आहे. दरम्यान, सरपंच भाभीचा कालावधी साधारणत: तीन-चार महिन्यांपर्यंतच आहे. गावच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेताना प्रशासकीय अडचणी येत असल्याने पुढील आठवड्यातील मासिक सभेत उपसरपंचाकडे गावचा कारभार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : परतीचा मान्सून बरसणार! पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा इशारा, आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Railway : हडपसर-हरंगूळ, नांदेड एक्स्प्रेसचे तीन डबे वाढणार

Beetroot Poriyal: खवलेले खोबरे अन् खमंग फोडणी; १० मिनिटांत बनवा दाक्षिणात्य पद्धतीची बीटरूट पोरियल! पाहा सोपी रेसिपी...

आजचे राशिभविष्य - 22 सप्टेंबर 2026

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT