Omicron variant
Omicron variant Sakal media
सोलापूर

सोलापूर : शहरात सौदी अरेबियाचे पाहुणे अधिक

सकाळ वृत्तसेवा

१८ देशांतून १०२ परदेशी नागरिक दाखल; ७३ जण निगेटिव्ह, २९ जणांची शोधमोहीम सुरू

सोलापूर : गेल्या पंधरा दिवसांत विविध देशातून १०२ नागरिक शहरात आले आहेत. यामध्ये सौदी अरेबिया येथील नागरिकांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत ७१ परदेशी पाहुण्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून ते सर्वचजण निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरित २९ नागरिकांची माहिती अपुरी असल्याकारणाने संबंधित व्यक्‍तींचा आरोग्य विभागाकडून शोध घेतला जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर शासन आदेशानुसार आता परदेशातून आणि कर्नाटक राज्यातून शहरात येणाऱ्या नागरिकांची तपासणी महापालिकेकडून करण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेला १ डिसेंबरपासून सुरवात झाली. आजतागायत विविध १८ देशांतून १०२ नागरिक शहरात दाखल झाले आहेत. शासनाकडून दररोज महापालिकेला या परदेशी नागरिकांची अद्ययावत यादी दिली जाते. ओमिक्रॉनच्याच्या पार्श्‍वभूमीवरदेखील आरटीपीसीआर तपासणी महत्त्वाची आहे. त्यासाठी शासनाकडून प्राप्त यादीनुसार महापालिकेने संबंधित व्यक्‍तींचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईन केले, त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.

एकूण १०२ नागरिकांपैकी आतापर्यंत ७३ नागरिकांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर तपासणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. हे सर्वचजण निगेटिव्ह निघाले. ८ डिसेंबर रोजी प्राप्त झालेल्या ५८ जणांच्या यादीपैकी २९ जणांची माहिती अपुरी मिळाल्याने शोध घेण्यात अडथळे आले आहेत. त्यांची चाचणी अद्याप बाकी असून त्या नागरिकांची शोधमोहीम आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत परदेशातून आलेल्या ७३ जणांची तपासणी करण्यात आली आहे. ते सर्वच निगेटिव्ह आले आहेत. जेवढ्या लोकांची यादी महापालिकेला प्राप्त झाली, त्या सर्व लोकांची तपासणी करण्यात आली आहे. अपुऱ्या माहितीमुळे ज्या नागरिकांचे ट्रेसिंग होऊ शकले नाही, त्यांच्या शोध मोहिमेसाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा कार्यान्वित केली आहे. लवकरच त्यांचीही चाचणी करण्यात येईल.

- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी महापालिका

या देशातून आले नागरिक

सौदी अरेबिया, युके, ओमन, जर्मन, बहरिन, स्वीडन, कतार, जपान, ऑस्ट्रोलिया, सिंगापूर, अमेरिका, नेदरलॅंड आदी १८ देशांतून शहरात १०२ नागरिक शहरात आले आहेत. यामध्ये सौदी अरेबिया नागरिकांची संख्या अधिक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT