Schools Reopening News esakal
सोलापूर

सोलापूर : मुलांची दररोज चार तासच शाळा! शिक्षकांना 'आरटीपीसीआर'चे बंधन

कोरोना रुग्ण कमी झाल्याने 1 फेब्रुवारीनंतर शाळा सुरु होणार आहेत. तत्पूर्वी, शिक्षकांना कोरोना चाचणीचे बंधन घातले असून सोलापूर शहरातील दोन हजार शिक्षकांमध्ये 31 शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना 15 दिवसांची सुट्टी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सध्या मृत्यूदर व रुग्णालयातील कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्ण वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने शाळा बंदच ठेवल्या. आता तीन दिवसांपासून रुग्ण निम्म्याने कमी झाल्याने 1 फेब्रुवारीनंतर सोलापूर, पुणे, यासह बहुतेक जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहेत. दररोज सकाळच्या सत्रात चार तासांचीच शाळा भरवावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Solapur Marathi News)

राज्यात 3 जानेवारीपासून कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरवात झाली आणि 7 जानेवारीला 41 हजार रुग्णांची नोंद झाली. उपाययोजा म्हणून राज्य सरकारने निर्बंध लागू केले. दुसरीकडे 31 जानेवारीपर्यंतच कोरोनाचा संसर्ग वाढेल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला. रुग्णालयातील रुग्ण खूपच कमी असल्याने आणि प्रतिबंधित लसीकरणामुळे रुग्ण सहजासहजी बरा होऊ लागल्याने लॉकडाउनचा निर्णय मागे पडला. 12 ते 23 जानेवारी या काळात दररोज सरासरी 41 हजार ते 46 हजारांपर्यंत रुग्ण वाढले.

21 जानेवारीला सर्वाधिक 48 हजार 270 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बहुतेक जिल्ह्यांनी शाळा बंदच ठेवल्या. दिलासादायक बाब म्हणजे मागील तीन दिवसांत रुग्ण घटले असून दररोज सरासरी 26 हजारांपेक्षाही कमी रुग्ण आढळले. त्यामुळे शाळा सुरू करण्यास हरकत नाही, असे प्रशासनाचे मत आहे. त्यादृष्टीने आता शाळांची स्वच्छता, शिक्षकांची कोरोना चाचणी, पालकांची संमती, अशा बाबींची पूर्तता केली जात आहे.

कोरोनाबाधितांना 15 दिवसांची सुट्टी

कोरोनाची स्थानिक परिस्थिती, शाळेतील विद्यार्थी, उपलब्ध वर्गखोल्या, उपस्थित विद्यार्थ्यांवर आधारित मुख्याध्यापकांनी शाळेची वेळ निश्‍चित करावी. विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक आणि वर्गखोल्यांची उपलब्धता अपुरी असल्यास दोन शिफ्टमध्ये शाळा भरवावी, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीचे बंधन घातले आहे. लक्षणे नसल्याने घरी राहून उपचार घेणाऱ्या शिक्षकांना 15 दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे. सोलापूर शहरातील चार हजार 852 शिक्षकांपैकी दोन हजार 57 शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट प्राप्त झाला. त्यात 31 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

शहरातील 241 प्राथमिक व 157 माध्यमिक शाळांमध्ये एक लाख 61 हजार 226 विद्यार्थी आहेत. 1 फेब्रुवारीनंतर शहरातील शाळा सुरू होणार असून दररोज चार तास शाळा भरेल. विद्यार्थ्यांची सुरक्षितता व गुणवत्ता याबाबींना प्राधान्य द्यावे, अशा सूचना मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

- कादर शेख, प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT