शंतनू पाटील sakal
सोलापूर

Solapur : शंतनू पाटील बनले भरड धान्य क्षेत्रातील भगीरथ

इंग्लंडमध्ये त्यांनी पर्यावरण व अन्न प्रक्रिया या दोन विषयात पदव्युत्तर संशोधन केले.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर, : अभियांत्रिकी शिक्षणाचा टप्पा पार करून इंग्लंडमध्ये अन्न प्रक्रियामधील उच्च शिक्षण घेतल्यानंतर बार्शीच्या शंतनू पाटील यांनी मिलेट (भरड धान्य ) खाद्यपदार्थ निर्मितीचा उद्योग उभारत आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बार्शी स्थित शंतनू पाटील यांनी कोल्हापुरात पर्यावरण अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी इंग्लंडमध्ये त्यांनी पर्यावरण व अन्न प्रक्रिया या दोन विषयात पदव्युत्तर संशोधन केले. खाद्यपदार्थ निर्मितीसाठी त्यांनी मिलेट उत्पादन घेण्याचे निश्चित केले. पण बाजारात नेमकी मागणी कशी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी सुरवातीला मार्केटिंगची नोकरी करत अभ्यास सुरु केला. २०१७ मध्ये मिलेट बाजारपेठ विकसित झालेली नव्हती. त्यासोबत उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामग्री देखील तितकीशी विकसित झालेली नव्हती.

उत्तम पोषण मूल्ये असलेल्या मिलेट खाद्यपदार्थांची मालिका देखील कमी होती. त्यांनी दक्षिण भारतातील संशोधन संस्थांना भेटी देऊन अधिक अभ्यास सुरु केला. घरचे भांडवल घालून उद्योग सुरु करण्याचे त्यांनी ठरवले. कृषी खात्याने त्यांना मदत केली. मिलेटच्या मध्ये बेकरी, स्नॅक्स व पीठे अशी उत्पादने निश्चित केली. त्यावेळी यंत्रसामग्री अद्ययावत नसल्याने त्यांनी उपलब्ध असलेल्या यंत्रात स्वतःच गरजेनुसार बदल करून घेतले.

दरम्यान, याच टप्यावर त्यांनी ‘अलसोग्रेड’ नावाने ब्रॅण्ड सुरु केला. विना मैद्याची बिस्किटे, शुगरफ्री डायट, लठ्ठपणापासून मुक्त करणारे पदार्थ हे ट्रेंड ओळखून त्यांनी उत्पादने बनवून घेतली. बार्शीचा ‘ज्वारी चिवडा’ हा ब्रॅण्ड त्यांनी प्रचार करून बाजारात आणला. बार्शीत स्वतःचे दुकान उघडून तेथे उत्पादनांची विक्री सुरु केली.

उत्पादनांची क्षमता भरपूर असल्याने त्यांनी इतर उद्योगांना कच्चा माल पुरवणे, पक्का माल पुरवणे, ब्रॅंडसहीत माल तयार करुन देणे, उत्पादनांसाठी आर ॲंड डी (रिसर्च ॲंड डेव्हलपमेंट) सेवा पुरवणे ही कामे सुरु केली. एकाच वेळी अनेक पातळ्यावर सेवा दिल्याने त्यांना वेगाने भांडवली गुंतवणुकीचा कर्जाचा भार कमी करता आला. नंतर त्यांनी वितरकांची चेन तयार करुन नगर, सातारा, पुणे शहरात उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचवली.

अलसोग्रेट उद्योजक श्री. पाटील यांनी विकसित केलेली व्यावसायिक मूल्ये

  • - मार्केटिंग जॉब करून आधी ग्राहकांची आवड, निवड अन् अभिरुची समजून घेणे.

  • - बाजारात कोणाशी स्पर्धा आहे याचा अभ्यास करून तशी माहिती संकलित करणे.

  • - एकाच प्लॅटफार्मवरुन विविध सेवा देण्याचा संकल्प सत्यात उतरविणे.

  • - उत्‍पादन क्षमता मोठी करून स्पर्धेत भक्कम राहण्याची भूमिका घेणे.

श्री. पाटील यांच्याबद्दल अजून काही...

  • - उद्योगातून २० जणांना रोजगार

  • - कोणत्याही मिलेटची उत्पादने घेण्याची क्षमता

  • - बार्शी ज्वारी चिवडा निर्मितीची वेगळी ओळख

  • - फिक्कीचा मिलेट स्टार्टअप पुरस्कार

  • - राज्य शासनाकडून विशेष पुरस्कार

  • - नियमित पाच उत्पादने व मागणीनुसार अन्य उत्पादन सेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT