Uddhav Thackeray Eknath Shinde and Devendra Fadnavis 
सोलापूर

Solapur : शिंदे गटाला भाजपशिवाय पर्याय नाहीच

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय

राजेश नागरे, सकाळ वृत्तसेवा

शिवसेनेत बंडखोरी करीत ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले आणि राज्यात अडीच वर्षांनी सत्तांतर झाले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच १०५ आमदार असतानाही भाजप विरोधी बाकावर बसला होता. त्याचे शल्य अडीच वर्षांतच भरून काढण्यात भाजप नेते यशस्वी ठरले. २०१४ ते २०१९ या काळात भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी भाजपला कंटाळून राजीनामे खिशात ठेवले होते. त्यानंतर अडीच वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत राहूनही काही मंत्र्यांनी पक्षाविरोधात विशेषत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच बंडखोरी केली.

पण, हे पाऊल उचलताना त्यांनी बहुधा भविष्यातील परिणामांचा विचार केला नसावा, असे जाणकारांचे मत आहे. आता शिवसेना फुटली असून दोन अधिकृत पक्ष (गट) निर्माण झाले आहेत. एका गटाकडे जनाधार तर दुसऱ्या गटाकडे सत्ता आहे, अशी स्थिती आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर शिंदे गट स्ट्राँग राहणार की कायमस्वरूपी भाजपलाच चिकटून बसणार, हे स्पष्ट होणार आहे. पण, शिंदे गटाच्या खांद्यावरून विरोधकांवर निशाणा साधण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होऊ नये म्हणून निश्चितपणे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होईल.

शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांना अजूनही सोलापूरसह राज्यभरात स्वत:ची अपेक्षित ताकद निर्माण करता आलेली नाही. पदाधिकारी नेमले, पण जनाधार कोणाकडे सर्वाधिक, याचा विचार करण्याची खरी गरज आता शिंदे गटाला आहे. सरकार येऊन १०३ दिवस होऊन गेले, पण सत्तासंघर्ष मिटलेला नाही. त्यांचा सर्वाधिक वेळ त्यातच गेला आहे. आता ऑक्टोबरअखेरीस किंवा नोव्हेंबरच्या मध्यावधीत महापालिका, नगरपालिका निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर होऊ शकतो. त्यावेळी शिंदे गटाला स्वबळावर नव्हे तर भाजपसोबतच जावे लागणार आहे, अशी सद्यस्थिती आहे.

- प्रतिनिधी महेश कोठेंच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय माजी महापौर महेश कोठे यांनी काही महिन्यांपूर्वीच घेतला आहे. पण, अद्याप त्यांनी प्रवेश केलेला नाही. दरम्यान, आता कोठेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. राज्यात व केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, असा आत्मविश्वास बाळगून त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटायला नको. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी देखील त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या तुलनेत शिंदे गटातून त्यांना आमदार होण्याची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कोठे यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जागा वाटपाचा तिढा सन्मानाने सुटल्यास निश्चितपणे महाविकास आघाडी होऊ शकते. भाजपने पाच वर्षाच्या सत्तेच्या काळात स्मार्ट सिटीच्या नावाखाली नुसता भ्रष्टाचारच केला. शिंदे-ठाकरे गटात वाद निर्माण झाला असून आता आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निश्चितपणे सोलापुरात मोठा पक्ष ठरले. भाजपने नागरिकांना ना पाणी ना चांगले रस्ते सुध्दा दिले नाहीत. आता महाविकास आघाडी झाल्यास निश्चितपणे भाजपचा पराभव होऊ शकतो.

- प्रकाश वाले, शहराध्यक्ष, काँग्रेस

निवडणुकीपूर्वी भाजपने शहरातील जनतेला एक-दोन दिवसाआड पाणी देण्याची ग्वाही दिली होती. उजनी धरण भरूनही पाच दिवसाआड पाणी मिळत आहे. केंद्रात, राज्यात व महापालिकेत सत्ता असतानाही आणि विशेष म्हणजे दोन मंत्री, एक खासदार असतानाही भाजपला स्थायी समितीचा सभापती निवडता आला नाही. बजेट सुध्दा वेळेत मांडले नाही. आता महाविकास आघाडी झाल्यास निश्चितपणे भाजप पराभूत होईल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

- भारत जाधव, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत सर्वात मोठा जनाधार आहे. शिंदे गटाकडे नवीन पदाधिकारी आहेत, पण, जनाधार नाही, अशी आवस्था आहे. पण, अंधेरी पूर्व पोट निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत निश्चितपणे महाविकास आघाडी होईल, असा विश्वास आहे. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपला पराभूत करणे हाच उद्देश आहे.

- पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांना अजूनही सोलापूरसह राज्यभरात स्वत:ची अपेक्षित ताकद निर्माण करता आलेली नाही. पदाधिकारी नेमले, पण जनाधार कोणाकडे सर्वाधिक, याचा विचार करण्याची खरी गरज आता शिंदे गटाला आहे. सरकार येऊन १०३ दिवस होऊन गेले, पण सत्तासंघर्ष मिटलेला नाही. त्यांचा सर्वाधिक वेळ त्यातच गेला आहे. आता ऑक्टोबरअखेरीस किंवा नोव्हेंबरच्या मध्यावधीत महापालिका, नगरपालिका निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर होऊ शकतो. त्यावेळी शिंदे गटाला स्वबळावर नव्हे तर भाजपसोबतच जावे लागणार आहे, अशी सद्यस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Latest Marathi News Updates: पुणे स्लीपर सेल मॉड्युल प्रकरणी अकरावी अटक

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

SCROLL FOR NEXT