CORONA sakal
सोलापूर

जिल्ह्यातील ‘हे’ सहा तालुके कोरोनामुक्त! सव्वादोन लाखांपैकी २.१६ लाख रुग्ण बरे

जिल्ह्यात सध्या ४५ रुग्ण असून अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर व सांगोला या सहा तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : एप्रिल २०२० मध्ये सोलापुरात दाखल झालेला कोरोना आता तिसऱ्या लाटेनंतर पुन्हा परतीच्या वाटेवर आहे. जिल्ह्यात सध्या ४५ रुग्ण असून अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर व सांगोला या सहा तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

जिल्ह्यातील दोन लाख २१ हजार ६५६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बाधित व मृतांची संख्या अधिक होती. प्रतिबंधित लसीकरणानंतर कोरोनाचा धोका कमी झाला आणि बाधितांची संख्याही रोडावली. लसीकरणामुळे नागरिकांमधील कोरोनाची भीतीदेखील कमी झाली आहे. अजूनही शहरात कोरोना झालेल्या ३१ व्यक्ती असून त्यात १७ महिला व १४ पुरुष आहेत. तर ग्रामीणमध्ये १० महिला व चार पुरुष उपचार घेत आहेत. आता कोरोनाबाधित रुग्ण पाच-सहा दिवसांत बरा होऊ लागला आहे. त्याला तीव्र तथा मध्यम स्वरूपाची लक्षणेसुद्धा नाहीत. संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या आणि अनेकांचा आधार हिरावणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि आता प्रतिबंधित लस या उपायांमुळे कोरोना विशेषत: मृत्यू नियंत्रणात आले आहेत. बहुतेक लोक विशेषत: ग्रामीणमधील नागरिक अजूनही कोरोनातील नियमांचे तंतोतंत पालन करीत असल्याचे चित्र आहे.

पाच तालुक्यांत १४ रुग्ण

जिल्ह्यातील सहा तालुके कोरोनामुक्त झाले असून, चार तालुके कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. सध्या बार्शी व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी तीन तर करमाळा व माढा तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. तर मंगळवेढ्यात चार रुग्ण आहेत. आगामी काही दिवसांत संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी सद्य:स्थिती आहे. दिलासादायक बाब म्हणजे, बार्शी व करमाळा ग्रामीणमध्ये तर माढा, माळशिरस शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती

  • एकूण बाधित

  • २,२१,६५६

  • आतापर्यंत कोरोनामुक्त

  • २,१६,३६९

  • कोरोनाचे बळी

  • ५,२४२

  • सक्रिय रुग्ण

  • ४५

दोन महिन्यांत एकही मृत्यू नाही

ऑगस्ट २०२० व २०२१ मध्ये जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची चिंता वाढविणारा कोरोना २०२२ च्या ऑगस्टमध्ये शांत असल्याची स्थिती आहे. १२ वर्षांवरील सर्वांनाच कोवॅक्सिन, कोर्बोवॅक्स व कोविशिल्ड लसीचे ठराविक अंतरानंतर तीन डोस दिले जात आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मागील दीड-दोन महिन्यांत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT