मोर्चात घुमला ‘डबल बेस’चा नारा sakal
सोलापूर

सोलापूर : मोर्चात घुमला ‘डबल बेस’चा नारा

‘जय भीम’च्या निनादात भीमसैनिकांनी फडकावले शंभर मीटर लांबीचे ध्वज

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : हाती निळे झेंडे अन्‌ मुखी ‘जय भीम’चा नारा यामुळे पार्क चौक परिसर भीमसैनिकांच्या गर्जनाने दुमदुमून गेला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायींनी शंभर मीटर अंतरापर्यंत पसरविलेल्या निळ्या झेंड्यामुळे आकाशातून भीमाची निळाई उतरली होती. तर अखेर मोर्चात भीमसैनिकांचा डबल बेसचा आवाज घुमला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त १७ एप्रिल रोजी निघणाऱ्या मिरवणुकीला पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी डीजेला परवानगी नाकारली. त्याच्या निषेधार्थ दोन बेस, दोन टॉप डीजेला परवानगी हवी, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १५) बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पार्क चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आंबेडकर चळवळीतील नेते, सामाजिक संस्था, राजकीय नेते, युवक आणि महिला मंडळ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते

मोर्चातील युवकांनी हाती निळे झेंडे, डोक्यावर निळी टोपी आणि मुखी ‘जय भीम’चा नारा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या मोर्चात सहभागी झालेल्या छोट्या भीमसैनिकांनी देखील ‘केस तर केस १६ बेस’ या घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लहान मुले, महिला वर्गदेखील मोठ्या उत्साहात या मोर्चात सहभागी झाला होता. त्याचबरोबर भव्य मोठा शंभर मीटरचा निळा झेंडा हाती घेउन युवकांचा ‘जय भीम’चा अखंड नारा सुरू होता. या मोर्चात मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते.

१६ राष्ट्रीय सणांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा समावेश आहे. त्यासाठी मुक्तता असायला हवी. पोलिसांबरोबर आमचा संघर्ष नाही. डीजे जप्त केले असले अथवा नाकाबंदी झाली असली तरी १७ एप्रिल रोजीच्या मिरवणुकीमध्ये डीजे वाजणारच.

- आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक

सोलापूर शहर पोलिस आयुक्त यांच्याबरोबर बैठक आहे. बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास जयंती साजरी केली जाइल अन्यथा ३० एप्रिल ते बुद्ध पौर्णिमेपर्यंत जयंतीचा उत्सव सुरु राहील.

- अजित गायकवाड,

मध्यवर्ती उत्सव अध्यक्ष, सोलापूर

सोलापुरातील मिरवणूक देशातील नंबर एकवर असते. या मिरवणुकीत युवकांना थिरकण्यासाठी दोन टॉप आणि दोन बेसची परवानगी द्यावी. याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. परवानगी नाकारल्यामुळे हा मोर्चा काढला.

- बाळासाहेब वाघमारे,महामंडळ अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT