सोलापूर

स्मार्ट सिटी योजनेतून मिळणार `या` गावांना पाणी

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन, फताटेवाडी व आहेरवाडी या गावांना स्मार्ट सिटी योजनेतून पाणी देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरु करण्याच्या प्रस्तावास गुरुवारी झालेल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

कंपनीचे संचालक तथा पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी दुपारी बैठक संपन्न झाली.  महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व श्री. शिंदे यांची संचालकपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांनी सर्व नूतन संचालकांचे स्वागत केले. यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेता महेश कोठे उपस्थित होते. 

समांतर जलवाहिनीसाठी एनटीपीसीने 250 कोटींचे साह्य मंजूर केले आहे. मात्र त्याचवेळी समांतर जलवाहिनीतून होटगी स्टेशन, फताटेवाडी आणि आहेरवाडी या गावांना पाणीपुरवठा करण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार आता समांतर जलवाहिनीचे काम वेगात सुरु असून, या गावांना पाणीपुरवठा करण्याची यंत्रणा उभारण्यासाठीही नियोजन करणे आवश्यक आहे, असा प्रस्ताव आला होता. त्यानुसार प्रस्तावास मंजुरी देण्यात आली तसेच या कामासाठी 15 कोटी रुपये तरतूद करण्यासही मुंजुरी दिली गेली. 

लक्ष्मी विष्णूच्या जागेवर एक्झबिशन सेंटर
कोणत्याही प्रदर्शनासाठी यापूर्वी होम मैदानाचा वापर केला जायचा. आता होम मैदान स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित होऊ लागल्याने प्रदर्शनासाठी लक्ष्मी विष्णू गिरणीच्या दमाणीनगर परिसरातील जागेवर एक्झबिशन सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेतून विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत. 

पार्क मैदानाचा विकास
इंदिरा गांधी स्टेडियमचा (पार्क मैदान) तातडीने विकास करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच या ठिकाणी व्यायामशाळा आणि वॅाकिंग ट्रॅक करण्यासही मंजुरी देण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उच्चांकापासून चांदी १.९४ लाखांनी स्वस्त, सोन्याच्या भावातही मोठी घसरण; ५ दिवसात भाव कोसळले?

Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा, मनसैनिक ट्रेनने रवाना; मोदी सरकारवर गंभीर आरोप

Ujani Water Storage: उजनीत ९७ टक्के पाणी, तरी भीमा नदी कोरडी; पिके करपू लागली, शेतकऱ्यांचा तातडीने पाणी सोडण्याचा आग्रह

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील संपूर्ण SIR रद्द झाली पाहिजे - राज ठाकरे

Coal India Bonus : कोल इंडिया कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; प्रत्येकाला १ लाख १० हजार २५० रुपयांचा बोनस

SCROLL FOR NEXT