2Pune_records_first_death_ol_0.jpg
2Pune_records_first_death_ol_0.jpg 
सोलापूर

सोलापुरात 'या' सोसायटीने करुन घेतले स्वतःला होम क्वारंटाईन 

प्रशांत देशपांडे

सोलापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे. त्यांना साथ देण्यासाठी जुळे सोलापुरातील मेलोडी रेसिडेन्सीमधील रहिवाशांनी स्वतःला होम क्वारटाइंन करून घेतले आहे. या रेसिडेन्सीमध्ये 55 सभासद राहतात. खबरदारीच्या उपाययोजनेचा भाग म्हणून त्यांनी नियमावली तयार केली आहे. 
 या सोसायटीतील रहिवाशांनी स्वतः पुढाकार घेत कोरोनाबाबत एकत्र विचार केला. सर्व सदस्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी विचार करून नियमावली तयार केली. सोसायटीमध्ये काही डॉक्‍टर असल्याने त्यांनी या आजाराचे गांभीर्य सदस्यांच्या लक्षात आणून दिले. या आजारात काळजी कशी घ्यावी, याबाबत माहिती मिळाल्याने सर्वांनी कडक नियम स्वतः घालून घेत त्याची अंमलबजावणी सुरू केली. 

आशी आहे नियमावली 
अपार्टमेंटमधील सभासदांनी घरातच थांबावे. फक्त महत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे. लहान मुलांना बाहेर खेळायला सोडू नये. घरातील कचरा आपापल्या फ्लोअरच्या जिन्याजवळ ठेवावा कचरेवाल्याला लिफ्ट वापरू न देता कचरा घेऊन जाण्यास सांगावे. 
परगावाहून येणाऱ्या नातेवाइकांना अपार्टमेंटमध्ये प्रवेश बंदी घरकाम करणाऱ्या बायका, दूधवाला, भाजीवाला, कुरिअर यांना प्रवेश बंदी पार्सल किंवा कुरिअर आलेले असल्यास एक दिवस खालीच ठेवून दुसऱ्या दिवशी देण्यात येईल. दूध पाकिटे खालीच साबणाने स्वच्छ धुवून न्यावीत. शक्‍यतो उघडे भांडे वापरू नये. लिफ्टमध्ये जाताना सॅनिटायझरने हात धुवूनच जावे. लिफ्ट दर दोन तासांनी स्प्रेने स्वच्छ करावी. पण्याच्या जारवाल्यांना पूर्ण बंदी. 

लहान मुलांनाखेळण्यास बंदी 

आमच्या अपार्टमेंटमधील जर कोणाला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे असेल तर अध्यक्ष किंवा सचिवाची परवानगी घ्यावी लागते. लहान मुलांना अपार्टमेंटमध्ये खेळण्यास बंदी आहे. 
- सुनील पस्तापुरे, सचिव 
 

अपार्टमेंटमध्ये सॅनिटायझरचा फवारा

आम्ही घरकाम करणाऱ्या सर्व कामगारांना बंदी घातली आहे. दिवसातून दोन वेळा अपार्टमेंटमध्ये सॅनिटायझरचा फवारा मारण्यात येतो. 
-डॉ. शिल्पा हार्डीकर 

एकत्र जेवण करणे व गाण्यांच्या भेंड्या

सध्या घरात बसून विविध विषयांवरचे वाचन, नेटसर्च, घरातील सदस्यांसमवेत एकत्र जेवण करणे व गाण्यांच्या भेंड्या खेळणे असा कार्यक्रम सुरू आहे. 
- डॉ. अंजली कुलकर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT