सोलापूर  sakal
सोलापूर

Solapur : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तनिष्कांचा दिल्लीत झेंडा

शेंगा चटणी, वेफर्स, ज्वारी पापडाच्या सादरीकरणाने भारावले अधिकारी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : तनिष्कांनी बटाटा वेफर्स, सेंद्रिय भाजीपाला, ज्वारीचे पापड, कुरड्या, शेंगा चटणीच्या दिल्लीत केलेल्या प्रात्यक्षिकांनी महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सचिव डॉ. अर्चना सिंग, नीती आयोगाच्या रेणू शहा, ''आयसीएपी''च्या कमल खुराणा अक्षरशः थक्क झाल्या.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गणातील सकाळ तनिष्कांच्या यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या रणरागिणींना जी २० अंतर्गत दिल्लीच्या ''वूमन आंत्रप्रिन्युअर्स शोकेसिंग बिझनेस मॉडेल्स अँड एंटरप्रायजेस'' उपक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्यासह महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील एकूण ३० महिला उद्योजक हजर होत्या. यावेळी डॉ. अर्चना सिंग, रेणू शहा, कमल खुराणा यांच्याशिवाय अनस खान, योगेश माळगे, शोविक धार, दिव्या राय, गौरव वशिष्ठ, ऋतुजा पाटील, जितेंद्र शर्मा उपस्थित होते.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील शीलाताई बरोळे (तांदूळवाडी) यांनी भाजीपाला, गुलाब व गुलाबजल, सुवर्णा मुडके यांनी सेंद्रिय भाजीपाला, लताताई पांडव यांनी ''पाभर''च्या माध्यमातून पापड, कुरड्या, राजश्री येनगुरे यांनी काळा मसाला व शेंगा चटणी, ज्योती राठोड यांनी काळा मसाला व बंजारा ज्वेलरी,

पूजा झुरळे यांनी कडक भाकरी व शेंगा चटणी, अनिता खेडे यांनी सेंद्रिय द्राक्ष व ज्वारी फ्लेवर शेवया, राधा चेंडके यांनी गावरान कोंबडी व शेळी व्यवसाय,सीमा बनसोडे यांनी शेंगा लाडू व ज्वारीचे चकली,महानंदा शिंदे यांनी ज्वारी व ज्वारीचे पदार्थ व भाजीपाला, अनिता माळगे यांनी सकाळ तनिष्का व यशस्विनी कंपनीमार्फत मिलेटमध्ये ज्वारी बिस्कीट, केक, लाडू, शेवया, सांडगे, भाकरी तसेच विविध शासकीय योजना राबवीत असल्याचे सखोल सादरीकरण केले. यावेळी महिला उद्योजकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT