ST-Bus Team eSakal
सोलापूर

सोलापूर : एसटीचा टॉप गिअर! दिवसाचे उत्पन्न पोचले ९० लाखांवर

सोलापूर विभागास दररोज ९० लाख रुपयांचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल पाच महिने संप पुकारल्याने एसटी बसची चाके थांबली होती. उत्पन्न घटले होते. मात्र, संपकरी कर्मचारी कामावर परत येताच महिनाभरातच एसटीच्या फेऱ्या व उत्पन्न पूर्ववत झाले आहे. सोलापूर विभागास दररोज ९० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला होता. कर्मचारी नसल्याने एसटीची सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर महामंडळाने ग्रामीण भागात एसटी सुरू केली. मात्र, अनेक ठिकाणी एसटीवर दगडफेकीच्या घटना घडल्या. यात एसटीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर सुरू असलेली एसटीची सेवा पुन्हा बंद करण्यात आली. परंतु, त्यासाठी अपेक्षित प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नव्हता. राज्य शासनाने संपकरी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली. तरीही कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास नकार दिला. अखेर न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना २४ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश देताच कर्मचारी सेवेत रुजू झाले.

कर्मचारी संपावर जाण्यापूर्वी कोरोनानंतर एसटीचे उत्पन्न वाढले होते. तेच उत्पन्न संपकाळात पुन्हा घटले. त्यानंतर कर्मचारी कामावर परत येताच दररोज ९० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असून, ६३८ गाड्या धावत आहेत तर दररोज दोन लाख किलोमीटरचा प्रवास होत असून, प्रतिदिन दोन हजार ३५० फेऱ्या होत असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना आणि कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. उन्हाळी सुट्यांमुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात आल्या आहेत.

- सुरेश लोणकर,विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT