ST Bus  Sakal
सोलापूर

सोलापूर : ST च्या उत्पन्न वाढीसाठी ‘प्रवासी मित्र’

सोलापूरमध्ये १८ मेपासून होणार अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जागेवर थांबून असलेल्या लालपरीच्या चाकांनी पुन्हा गती घेतली आहे. संपामुळे ग्रामीण भागात एसटी न धावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. मात्र कर्मचारी पुन्हा कामावर परतल्याने ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत झाले आहेत. मात्र एसटीला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी आणि जास्तीत-जास्त प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा यासाठी शहरतील ४० ठिकाणी प्रवासी मित्र थांबणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशाने संप मागे घेतला. संपामुळे एसटी जागेवर थांबली होती. सोलापूरमधील ग्रामीण भागातील गावगाडा ठप्प झाला होता. प्रवाशांना खासगी वाहनांना अधिकचे पैसे देऊन प्रवास करावा लागला. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांचे गणित बिघडले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाचे आर्थिक गणित चुकले आहे. एसटी आगारात थांबल्याने प्रवासी खाजगी वाहतूकीकडे वळले होते. खासगी वाहनांकडे वळलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळविण्यासाठी प्रवासी मित्र संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रवासी गर्दी असलेल्या ठिकाणी जिल्हा वाहतूक नियंत्रक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रवासी मित्र म्हणून तैनात करण्यात येणार आहे. प्रवासी मित्र मार्फत बसचे ठिकाण व याची माहिती तसेच प्रवाशांना बसमध्ये बसविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे लालपरीला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, अशी आशा अधिकाऱ्‍यांनी व्यक्त केली आहे.

सहा महिन्यांच्या संपानंतर कर्मचारी कामावर रुजू झाले. दररोज दोन लाख किलोमीटरचा प्रवास होत आहे. 60 ते 70 लाख रुपयांचे उत्पन्न विभागाला मिळत आहे. एसटीपासून लांब गेलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळविण्यासाठी प्रवासी मित्र योजना राबविण्यात येत आहे. पुन्हा कर्मचाऱ्यांच्या सोबतीने एसटीची सेवा सुरु झाली आहे.

- सुरेश लोणकर, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Ambarnath इंधन तुटवड्याच्या अफवेमुळं टाकी फुल्ल केली, दुचाकी पेटली; घटनेचा VIDEO VIRAL

जिद्द आणि कष्टाला वर्दीचा सलाम! नारोडीची लेक ऋतुजा हुले महाराष्ट्र पोलीस दलात; ग्रामीण भागातील तरुणीची स्वप्नपूर्ती

3000 रिक्षांची चाके थांबली! गॅस तुटवड्यामुळे पंपाबाहेर रिक्षांच्या रांगा; ‘एलपीजी’चे दर 32 रुपयांनी वाढले, ‘या’ शहरात रिक्षा प्रवास 10 रुपयांनी महागला

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT