st strike  sakal
सोलापूर

सोलापूर : कर्मचाऱ्यांचा संप मिटेना एसटीचा तोटा भरून निघेना

सोलापूर विभागाला 21 कोटींचा आर्थिक फटका

विजय थोरात

सोलापूर : एसटी महामंडळाचे (ST) राज्य शासनात विलीनीकरण करावे या मुख्य मागणीसाठी व इतर कारणांसाठी मागील 44 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन (ST Worker Strike) सुरू आहे. परंतु संपाच्या काळात अनेक घडामोडी घडल्या. तरीही काही केल्या कर्मचारी मागे हटले नाहीत. प्रशासनाकडून निलंबन, बडतर्फ, सेवासमाप्ती यासारख्या कारवाया करून देखील काही फायदा झाला नाही. परंतु कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सोलापूर विभागास जवळपास 1 कोटी 7 लाख 47 हजार 606 किमीचा प्रवास रदद होवून 21 कोटी 88 लाख 31 हजार 912 रुपयांचा आर्थिक फटका बसला असल्याची माहिती एसटीच्या विश्वसनीय सूत्रांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

दिवाळीनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णत कोलमडली. त्यामुळे गावी आलेल्या प्रवाशांना परत आपल्या निश्‍चित स्थळी पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. मात्र खासगी वाहनांचा आधार घेत असताना अव्वाच्या सव्वा भाडे खासगी वाहनधारकांना द्यावे लागले. त्यामुळे याचा देखील सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक फटका बसला आहे.

शासनाने 41 टक्के पगारवाढ घोषित केली आहे. मात्र प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने अखेर प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोलापूर विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाईचे हत्यार उपसण्यात आले. मागील पंधरा दिवसांपासून ज्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन वाढ मान्य आहे ते कर्मचारी कामावर हजर होऊ लागले आहेत त्यामुळे एसटीच्या गाड्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे हळूहळू एसटीचे चाके पुन्हा धावण्यास सुरुवात झाली आहे.

एकूण कर्मचारी

3900

एकूण आगार

9

एकूण चालक

1388

एकूण वाहक

1320

प्रशासकीय कर्मचारी

499

कार्यशाळेतील कर्मचारी

734

निलंबित कर्मचारी

377

सेवा समाप्ती

28

बदली कर्मचारी

400

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT