Success Story sakal
सोलापूर

Success Story : पोराने नाव काढलं, सफाई कामगार ते रेल्वेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण

छोट्या मोठ्या नोकऱ्या, नोकरीच्या पैशाच्या जमवाजमवीतून पुन्हा शिक्षण, शिक्षण संपल्यानंतर पुन्हा अपार्टमेंटची स्वच्छता व वॉचमन म्हणून काम.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : छोट्या मोठ्या नोकऱ्या.... नोकरीच्या पैशाच्या जमवाजमवीतून पुन्हा शिक्षण.... शिक्षण संपल्यानंतर पुन्हा अपार्टमेंटची स्वच्छता व वॉचमन म्हणून काम… एवढा संघर्ष करत कुमठेच्या प्रणीत घायाळकर याने अखेर रेल्वेत नोकरी मिळवून आई-वडिलांच्या कष्ट करणाऱ्या हातांना विश्रांती मिळवून दिली.

कुमठे येथील प्रणीत घायाळकर याचे कुटुंब मध्यंतरीच्या काळात अचानक कोरोना काळात आर्थिक संकटात सापडले. घर विकल्याने कोणताच आधार राहिला नाही. आईने सेल्‍समनचे काम सुरू केले.

वडील देखील बाहेर कामावर जाऊ लागले. जगण्यासाठी अटीतटीचा संघर्ष सुरू झाला. एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनचे काम प्रणीतला मिळाले. त्यासोबत राहण्यासाठी एक रूम देखील मिळाली.

अपार्टमेंटमध्ये साफसफाई, गाड्यांची स्वच्छता व थोडा पगार मिळू लागला. रोज ही कामे करून प्रणीत अपार्टमेंटच्या व्हरांड्यात अकरावी व बारावी शिकला. नंतर त्याने डिझेल मेकॅनिक ट्रेडचा आयटीआय केला. मग टाटा मोटर्समध्ये काही महिन्याचे काम मिळाले. त्याचे जमलेले पैसे घेऊन प्रणीतने पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळवला.

पुन्हा पैसे संपल्याने प्रणीतने एज्युकेशन लोन काढून पुढील वर्षाचे शिक्षण घेतले. इकडे अपार्टमेंटमध्ये नियमित सफाई व इतर कामे तो करतच होता. शिक्षण, अभ्यासानंतर हे काम करून तो पैसे कमवत होता.

त्याला पुन्हा टाटा मोटार्स व झुआरी सिमेंटमध्ये काम मिळाले. या नोकरीचे पैसे मिळाल्यावर त्याने व्ही. व्ही. पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात पार्ट टाइम बी.टेक.चे शिक्षण सुरू केले. शिक्षणासोबत त्याने आता रात्रपाळीचे काम व दिवसात अपार्टमेंटचे काम, असे तीन कामे एकाचवेळी सुरू ठेवली.

दरम्यान, रेल्वेच्या भरतीसाठी त्याने अर्ज केला. त्याचे क्लासेस लावण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. पण कोणीतरी नाव न सांगता क्लासेसचे श्री. केशरी यांच्याकडे त्याची फी भरून टाकली. तो पहिल्याच प्रयत्नात या परीक्षे त उत्तीर्ण झाला. पण कोरोनामुळे प्रक्रिया लांबली.

पुरेशा कमाईचा आत्मविश्वास आल्यावर त्याने आधी आई व नंतर वडिलांना त्यांचे काम थांबवण्यास सांगितले. मग त्याच्या भाऊजीने केलेल्या मदतीमुळे एक प्लॉट त्याने खरेदी केला. नंतर त्याचे लग्न झाले. प्रणीतला मुलगी झाल्यानंतर त्याला नुकताच रेल्वेचा कॉल आला. आता तो रेल्वेच्या सेवेत रुजू होणार आहे.

  • स्वतः कामे करून त्यातून शिक्षणाची फी भरली

  • शिक्षण संपले की उरलेल्या वेळेत पुन्हा कष्ट करून कमाई

  • दहावी, आयटीआय, पॉलिटेक्निक व बी.टेक.चेपर्यंत स्वकष्टावर शिक्षण

  • एका सायकलवर नोकरी व शिक्षण

  • अखेर रेल्वेत मिळाली कायमस्वरूपी नोकरी

  • आई-वडिलांचे कष्ट थांबवून मिळवून दिली विश्रांती

तुझ्याकडे किती पैसे आहेत

प्रणीतच्या वडिलांचा अचानक अपघात झाल्यानंतर त्यांना मधुमेह असल्याने कोणी दाखल करून घेत नव्हते. तेव्हा अपार्टमेंटमुळे ओळखीचे असलेले अस्थिरोग तज्ञ डॉ. सचिन कुलकर्णी यांच्याकडे तो वडिलांना घेऊन गेला.

डिसचार्जच्यावेळी त्याने दवाखान्याचे बिल विचारले. तेव्हा डॉ. कुलकर्णी यांनी त्याला तुझ्याजवळ किती पैसे आहेत हे विचारले.

तेव्हा प्रणीतने चार हजार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तीन हजार घेऊन उरलेले एक हजार रुपये औषधासाठी ठेवण्यास सांगितले. नंतर बाहेरच्या लोकांनी त्याला या उपचारासाठी पंधरा हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे लागतात, असे सांगितल्यावर त्याचे डोळे पाण्याने भरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT