माळी शुगरच्या ८९ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ sakal
सोलापूर

सोलापूर : साखरेचे दर वाढले तरी कारखाने मूळ स्थितीत

माळी शुगरच्या ८९ व्या गाळप हंगामाचा शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा

माळीनगर : एकीकडे साखरेच्या दरात २०० ते २५० रुपयांची वाढ झाली आहे. हे खरे असले तरी साखरेची विक्री होत नाही. साखरेच्या वाढीव दरावर बॅंका कर्ज देत नाहीत. दुसरीकडे उसाची एफआरपी वाढली आहे. कामगारांचे पगार १२ टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. अशातच ऊस तोडणी वाहतुकीचे दर वाढण्यासाठी वाहतूकदार आग्रही आहेत. त्यामुळे साखरेचे दर वाढूनही कारखाने मूळ आर्थिक स्थितीतच राहणार आहेत, असे मत दि सासवड माळी शुगर फॅक्‍टरीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे यांनी व्यक्त केले.

माळीनगर साखर कारखान्याच्या ८९ व्या गाळप हंगामाचा प्रारंभ ऊसमोळी गव्हाणीत टाकून आज झाला. तत्पूर्वी ऊस उत्पादक शेतकरी संजय तरडे (माळशिरस) यांच्या हस्ते गव्हाणीचे विधीवत पूजन झाले. यावेळी २१ सेवानिवृत्त कामगारांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष नंदकुमार गिरमे, उपाध्यक्ष परेश राऊत, पूर्णवेळ संचालक सतीश गिरमे, संचालक मोहन लांडे, राहुल गिरमे, अशोक गिरमे, निळकंठ भोंगळे, विशाल जाधव, निखिल कुदळे, सतेज पैठणकर, माजी व्यवस्थापकीय संचालक अरविंद जाधव, दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव अनिल रासकर आदी उपस्थित होते.

यंदा कारखाना सहा लाख टन उसाचे गाळप करणार असल्याचा उल्लेख करून राजेंद्र गिरमे म्हणाले, सध्या जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांपुढे तोडणी वाहतुकीचा प्रश्न उभा राहिला आहे. ऊस वाहतूकदार ट्रॅक्‍टरमालक यांचा यामध्ये कोणताही अट्टाहास नाही. काही पुढाऱ्यांमुळे सर्व कारखान्यांची वाहने अडकली आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. यामध्ये कारखाने, शेतकरी, ऊस तोडणी कामगार व वाहतूकदार यांचे मोठे नुकसान आहे. याकडे सरकारने अगोदरच लक्ष द्यायला हवे होते. मात्र, याची कोणीही दखल घ्यायला तयार नाही. पाऊस, तोडणी वाहतुकदारांचा संप यामुळे हंगामास विलंब होत आहे. दिवाळीसाठी कामगारांना १५ टक्के बोनस देणार असल्याची घोषणा श्री. गिरमे यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT