Scrap vehicle sakal
सोलापूर

Solapur News : वाहने स्क्रॅप करण्याबाबत परिवहन आयुक्तांनी केले मोठे वक्तव्य

मागील काही महिन्यापासून १५ वर्षे वापरलेली वाहने स्क्रॅपमध्ये काढली जाणार असल्याचे आदेश निघाल्याचे सांगितले जाते. त्यावरून अनेक प्रकारचे गैरसमज पसरवले जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मागील काही महिन्यापासून १५ वर्षे वापरलेली वाहने स्क्रॅपमध्ये काढली जाणार असल्याचे आदेश निघाल्याचे सांगितले जाते. त्यावरून अनेक प्रकारचे गैरसमज पसरवले जात आहेत.

सोलापूर - जी वाहने १५ वर्षे वापरली, ती वाहने स्क्रॅप केली जाणार या बद्दलच्या जीआर संदर्भात ठोसपणे स्पष्टता नसल्याने वाहन क्षेत्रात त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ लागला आहे. प्रत्यक्षात हा जीआर फक्त सरकारी वाहनापुरता आहे हे विशेष. प्रत्यक्षात १५ वर्षे वाहन वापरल्यानंतर त्याच्या सध्याच्या सुस्थितीबद्दलच्या चाचण्या करून या संबंधित वाहनांना पुढे वापराच्याबद्दल मुदतवाढ दिली जाणार आहे.

मागील काही महिन्यापासून १५ वर्षे वापरलेली वाहने स्क्रॅपमध्ये काढली जाणार असल्याचे आदेश निघाल्याचे सांगितले जाते. त्यावरून अनेक प्रकारचे गैरसमज पसरवले जात आहेत. १५ वर्षे वापरले गेलेले वाहन पुन्हा वापरता येणार नाही. वाहनाचे आयुष्यमान १५ वर्षे समजून ती विकण्याचे प्रकार वाढीस लागले होते. तसेच जी वाहने १५ वर्षे वापरानंतर देखील सुस्थितीत आहेत, त्यांचे काय असाही प्रश्न मांडला जात होता.

या बाबत अनेक गैरसमज वाढीस लागले असताना सर्वसाधारण वाहन चालकांसमोर नवे प्रश्न निर्माण झाले होते. जी वाहने सुस्थितीत आहेत, त्याचे काय करायचे. तसेच दर १५ वर्षाला नवीन वाहन घेणे किती जणांना परवडेल असे सांगितले जात होते. दुसरीकडे वाहन उत्पादक उद्योगांमध्ये देखील या आदेशावरून नवीन धोरणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती.

याबाबत परिवहन कार्यालयात विचारणा केली असता खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, मुळ जीआरमध्ये केवळ १५ वर्षे वापरलेली सरकारी वाहने स्क्रॅपमध्ये काढावीत, असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे स्क्रॅपचा मुद्दा अन्य कोणत्याही खासगी मालकीच्या वाहनांना लागू होत नाही.

या बाबत राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी सांगितले की, १५ वर्षे पेक्षा अधिक कालावधी झालेल्या वाहनांच्या तपासणीसाठी राज्यभरात विविध वाहनाचे फिटनेस तपासणी केंद्रे सुरु करण्यात येतील. या तपासणीद्वारे वाहनांची सुस्थिती समजून घेता येणार आहे. तसेच सुस्थितीत असलेल्या वाहनांना पुढील कालावधीसाठी मुदतवाढ मिळू शकेल. लवकरच ही केंद्रे राज्यात सुरु केली जातील.

खोट्या अफवांचे पीक; दलांलाची दिवाळी

पंधरा वर्षे झालेल्या गाड्या रस्त्यांवर चालू दिल्या जाणार नाहीत, तशी वाहने आढळली तर आरटीओ आणि पोलिस यांच्याकडून कारवाई होणार, या संदर्भात अत्यंत चुकीची आणि अपुरी माहिती पसरविली गेली आहे, खोट्या अफवांचे पीक सध्याही पसरविले जात आहे. त्यामुळे अनेकजण पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या गाड्या विकत आहेत. खास करून बाब म्हणजे १५ वर्षे झाली आणि गाडीची स्थिती चांगली असली तरी अशा गाड्या चालणार नाहीत, कारवाई होणार अशी भीती पसरली असल्याने संबंधित गाड्या येईल त्या किमंतीला विकल्या जात आहेत. यातून गाड्या मालकांचे नुकसान होत आहेत. तर दलांलाचा फायदा होत आहे. गाडी खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांनीच स्क्रॅप गाड्यांसदर्भात खोट्या अफवा पसरविल्या आहेत. १५ वर्षाच्या गाड्यांच्या विक्रीतून दलालांची कमाईची दिवाळी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT