Tur Dal and Masoor Dal sakal
सोलापूर

Solapur News : तुरीची ‘डाळ’ शिजणे अनिश्‍चित; स्वस्त मसूरचा वाढता वापर

पावसाचा खरीपाला फटका, मूग अन्‌ उडीदाला झटका

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - यंदाच्या पावसाळ्यात तब्बल महिनाभर पावसाने घेतलेल्या विश्रांतीचा फटका खरीप हंगामाला बसलाय. तुरीच्या पिकाचे भवितव्य अनिश्‍चित झाल्याने तुरीची ‘डाळ’ शिजणार नाही हेच वास्तव दिसत आहे. पावसाच्या फटक्याचा परिणाम मूग आणि उडीदावर झाला आहे. तुर, मूग आणि उडीद या डाळींचे भाव वाढल्याने आहारात मसूर डाळीचे प्रमाण वाढू लागले आहे.

यावर्षी बाजारात पावसाअभावी मूग व उडीद पिके हाताशी आली नाहीत. तर तुरीच्या पिकाचे भवितव्य केवळ पावसावर अवलंबून राहिले आहे. सध्याच्या स्थितीत कमी भावाच्या मसूर डाळीचा वापर वाढला आहे. हॉटेलिंग व खाद्यपदार्थ उद्योगाने मसूर डाळच सर्रास वापरण्यास सुरवात केली आहे.

अवर्षणाने बाजारपेठेत सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. खरिपाच्या हंगामात मूग व उडदाचे उत्पादन घटल्याने डाळ बाजाराच्या हंगामाची सुरवात वाईटच झाली. त्यानंतर आता तुरीच्या हंगामाकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. यावर्षी तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तुरीच्या पिकाचा कालावधी देखील मोठा असतो. यामुळे पावसाचा सध्या ताण सोसूनही परतीचा पावसाने साथ दिली तर तूरडाळ बाजारात येईल अशी आशा आहे.

ठळक बाबी

- मुगाची डाळ महागणार

- तुरीचे लागवड क्षेत्र वाढले पण एका पावसाची गरज

- एका पावसाने डाळ बाजाराचे चित्र बदलणार

- हॉटेल व खाद्यपदार्थ व्यवसायाचा मसूर डाळीवर वापराचा जोर

- तुरीच्या डाळीला पर्याय म्हणून मसूर डाळीचा वापर

- आयात मसूर डाळीमुळे बाजारात मागणी व पुरवठ्याचा समतोल

डाळीचे भाव (प्रतिकिलो)

मूग दाळ- ११२ रुपये

उडीद दाळ- १०० रुपये

मसूर दाळ- ७२ रुपये

मसूर डाळीची निर्मिती

सोलापुरात दालमिलची संख्या मोठी आहे. दरवर्षी मुगाच्या हंगामापासून दालमिल सुरु होतात. पण यावर्षी दालमिलचालकांना कच्चा माल मिळालाच नाही. त्यामुळे हंगाम सुरु करण्याची अडचण झाली आहे. तूर बाजारात येण्यासाठी आणखी चार महिन्याचा अवकाश आहे. त्यातही पाऊस सुरळीत पडला तरच तुरीच्या पिकाची शक्य़ता चांगली आहे. त्यामुळे आता हंगामासाठी कच्चा माल मिळेनासा झाला आहे. या परिस्थितीत एका उद्योजकाने मसूर मागवून त्याची दाळ करण्याचा प्रयोग केला आहे.

यावर्षी मूग व उडदाची आवकच कमी प्रमाणात झाली. मूग तर कुठेच मिळत नाही. तर उडीद पूर्वी झालेल्या पावसावर काही नदीकाठाच्या परिसरात आले आहेत. अगदीच थोडकी आवक झाली आहे. तुरीचे क्षेत्र या वर्षी वाढलेले असले तरी पावसाची मोठी गरज आहे. अजूनही चांगला पाऊस झाला तर तुरीची स्थिती सुधारू शकते.

- महेश सिंदगी, दाळ व्यापारी व संचालक, चेंबर ऑफ कॉमर्स, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT