Solapur  sakal
सोलापूर

Solapur : उजनी धरणातून भीमा नदी पाणी सोडल्याने चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली

उजनी धरणातून भीमा नदीमध्ये गुरुवारी 26 हजार 663 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे

राजकुमार घाडगे

पंढरपूर: उजनी धरणातून भीमा नदीमध्ये गुरुवारी 26 हजार 663 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे येथील चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढले असून जुन्या दगडी पुलावर पाणी आले आहे. मागील काही दिवसांपासून उजनी धरण क्षेत्रामध्ये परतीच्या पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. गुरुवारी उजनी धरणामध्ये 108 टक्के पाणीसाठा होता. बुधवारी सायंकाळी उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये 21 हजार 600 क्यूसेकचा विसर्ग होता तो गुरुवारी सकाळी 26 हजार 663 क्युसेक करण्यात आला. उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली असून नदीपात्रातील मंदिरांना पाण्याने वेढले आहे.

दरम्यान पंढरपूर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये परतीचा पाऊस जोरदार बरसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. सततच्या ढगाळ हवामानामुळे डाळिंब व द्राक्ष बागा देखील धोक्यात आल्या आहेत. * पंढरपूर तालुक्यातील गुरुवारचे मंडल निहाय पर्जन्यमान: करकंब 09 मिमी, पटवर्धन कुरोली 51 मिमी, भंडीशेगाव 53 मिमी, भाळवणी 37 मिमी, कासेगाव 19 मिमी, पंढरपूर 43 मिमी, तुंगत 32 मिमी, चळे 27 मिमी, पुळुज 13 मिमी, एकूण पाऊस 284 मिमी तर सरासरी पाऊस 31.55 मिमी *फोटो ओळी पंढरपूर: उजनी धरणातील विसर्गामुळे चंद्रभागा नदी पात्रातील मंदिरांना पडलेला पाण्याचा वेढा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Protest : JPSC-JSSC वाद पेटला, आंदोलक विद्यार्थी तारेचे कुंपण भेदून विधानसभेसमोर पोहोचले, पोलिसांकडून लाठीचार्ज

Investment In IPL Team: आयपीएल टीममध्ये गुंतवणूक कशी कराल? कोणत्या संघाचे शेअर्स उपलब्ध? स्टेप बाय स्टेप माहिती...

अरेच्चा! डोंबिवलीच्या आहेत ऐश्वर्या नारकर; शाळेचं नाव वाचून विश्वास बसणार नाही; म्हणाल्या- आई खिडकीतून डब्बा...

RINKU SINGH LOVE STORY: एका ‘लाईक’पासून सुरू झाली लव्हस्टोरी; प्रियाने सांगितला रिंकूसोबतच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा

Independence Day 2026: 15 ऑगस्टला अनुभवा खरा इतिहास! यंदाच्या स्वातंत्र्यदिनी 'या' ऐतिहासिक ठिकाणांना नक्की भेट द्या...

SCROLL FOR NEXT